
जळगाव : महापालिकेतील (Jalgaon Corporation) व भाजप बंडखोर (Rebel) नगरसेवक (Corporators) प्रकरणी नाशिक विभागीय आयुक्तांसमोर (Divisional Commissioner) सुरू असलेली सुनावणी आता २० सप्टेंबरला होणार आहे. भारतीय जनता पक्षातून घाऊक पक्षांतर करून शिवसेनेत गेलेल्या या नगरसेवकांचे भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Jalgaon Mayor & Corporators future depends on Divisional commissioner hearing)
महापालिकेत महापौर निवडीच्या वेळेस भारतीय जनता पक्षाचे २७ नगरसेवक फुटले होते. त्यांना अपात्र ठरवावे, अशी याचिका भाजप गटनेते भगत बालाणी यांनी दाखल केली होती. त्यावर महापालिकेच्या प्रभाग समिती सभापती निवडीत भाजपचा व्हीप डावलल्यामुळे भाजपचे २७ नगरसेवक यांना अपात्र ठरवावे, या मागणीची याचिका फुटीर गटाचे गटनेते ॲड. दिलीप पोकळे यांनी दाखल केली होती.
या दोन्ही याचिकांवर नाशिक विभागीय आयुक्तासमोर सुनावणी सुरू आहे. आज साक्षीदार भाजप नगरसेवक राजू मराठे यांची उलट तपासणी फुटीर गटाच्या वकिलातर्फे घेण्यात आली. आता या प्रकरणी पुढील सुनावणी २० सप्टेंबरला होणार आहे.
----
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.