धक्कातंत्रामुळे `त्या` ९ आमदारांना आजच मंत्री झाल्यासारखं वाटतंय!

सामाजिक, प्रादेशिक समतोलाचा फॉर्म्युला कुणाच्या पथ्यावर पडणार याची राजकीय चर्चा.
Gulabrao Patil, Girish Mahajan, Chimanrao Patil & Kishor Patil
Gulabrao Patil, Girish Mahajan, Chimanrao Patil & Kishor PatilSarkarnama

जळगाव : राज्यात (Maharashtra) नवे सरकार स्थापन होत असताना, केंद्रीय (Centre Government) नेतृत्वाने धक्कातंत्राचा वापर केला. त्याच धर्तीवर मंत्रिपदे वाटप होणार असल्याने धक्कातंत्राच्या अपेक्षेत जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील विरोधी पक्षातील दोघे वगळता सर्वच नऊ आमदार मंत्रिपदाचे दावेदार बनले आहेत. (Shivsena rebel & BJP MLA expecting Minsterial portfolio)

Gulabrao Patil, Girish Mahajan, Chimanrao Patil & Kishor Patil
संजय राऊत करणार नाशिकला शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन!

त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिपदे देताना सामाजिक व प्रादेशिक समतोल साधला जाईल, या वक्तव्यानेही जिल्ह्यातील संभाव्य मंत्रिपदाबद्दल उत्सुकता वाढली आहे.

शिवसेनेत आतापर्यंतचे सर्वांत मोठे बंड होऊन राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाले आहे. तूर्तास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी झाला असून, ११ जुलैस बंडखोर आमदारांच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवरील सुनावणीनंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. तोपर्यंत तरी सत्तेत नव्याने बसलेल्या मावळत्या व संभाव्य मंत्र्यांना वाट पाहावी लागणार आहे.

Gulabrao Patil, Girish Mahajan, Chimanrao Patil & Kishor Patil
दादा भुसेंच्या बैठकीत मोबाईल स्वीच ऑफ अन् कडेकोट बंदोबस्त

जळगावला सर्वच दावेदार

विधानसभेच्या ११ मतदारसंघांच्या जळगाव जिल्ह्यात अमळनेर, रावेर वगळता अन्य ८ मतदारसंघांमध्ये भाजप- शिवसेनेचे आमदार आहेत. उर्वरित एका मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत अपक्ष आमदार आहे. एकाच जिल्ह्यात सत्तेतील पक्षांमध्येच तब्बल ९ आमदार असतील, तर मंत्रिपदे नेमकी किती व कुणाला देणार, असा प्रश्‍न श्रेष्ठींसमोर असेलच. त्यामुळे या प्रश्‍नाचे उत्तर नेतृत्व कसे शोधते, याबद्दल कमालीची उत्सुकता लागून आहे.

दोन मंत्रिपदे तर नक्कीच

शिवसेनेत बंड होताना जिल्ह्यातील सर्वच (पाचही) आमदार शिंदे गटास मिळाले. भाजपचे विधानसभेतील चार व चंदू पटेल विधानपरिषदेचे सदस्य म्हणून ५ आमदार आहेत. त्यामुळे सेना- भाजपतून प्रत्येकी एक अशी दोन मंत्रिपदे नक्की मानली जाताहेत.

विद्यमान की ज्येष्ठाला संधी

मंत्री असूनही जे आले त्यांना हमखास मंत्रिपद देण्याचे ठरल्याची चर्चा आहे. त्यामुळे गुलाबराव पाटलांचा नंबर लागू शकतो. मात्र, गुलाबरावांपेक्षा ज्येष्ठ असलेले चिमणराव पाटील व तरुण आमदार किशोर पाटील हे शिंदेंच्या पहिल्या गाडीत बसले होते. शिवाय सामाजिक समतोलाचा विचार होईल तेव्हा त्यांचा दावाही असेलच. महिला मंत्री असाव्यात म्हणून जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार लता सोनवणेंचा विचार होणे स्वाभाविक ठरते.

भाजपतून कोण?

फडणवीसांचे निकटवर्तीय व राज्याचे नेते म्हणून ओळख मिळविलेले गिरीश महाजन मंत्रिपदाचे प्रमुख दावेदार आहेत. सामाजिक समतोल साधताना गुलाबराव पाटील यांना पद दिले, तर महाजनांचे काय, असा प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो. समाज म्हणून एकनाथ खडसे यांना पर्यायी नेतृत्वाचा विचार करताना राजूमामा भोळे यांचे नाव समोर आहे. मात्र, धक्कातंत्राची पुनरावृत्ती झाल्यास मंगेश चव्हाण, संजय सावकारे अथवा चंदू पटेल यांचे नाव देखील पुढे येऊ शकते.

पुढच्या निवडणुकीचा विचार

मंत्रिपद देताना भाजपतील शीर्षनेतृत्व आगमी २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवेल आणि स्वत: एकनाथ शिंदे व फडणवीस २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करून शिफारस करतील, एवढे मात्र निश्‍चित.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in