किडनी घ्या, पण रस्ते दुरुस्त करा हो!

शहरातील रस्त्यांची स्थिती खराब झाली असून, नागरिकांनी महापालिकेला साकडे घातले आहे.
Jalgaon
Jalgaonsarkarnama

जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट झाली असून, महापालिकेकडून आर्थिक परिस्थितीचे कारण देत शहरातील रस्त्यांची कामे देखील थांबली आहेत. त्यामुळे वैतागलेल्या जळगावकर नागरिकांनी महापालिका प्रशासनाला आपली किडनी घेऊन, ती विकून मिळालेल्या रक्कमेतून शहरातील रस्ते तयार करण्याचे साकडे घातले आहे.

कर भरून देखील जळगावकरांना सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यातून वाहन चालविणे कठीण झाले आहे. यामुळे अनेक नागरिकांना कंबर दुखीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सोमवारी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली अनेक नागरिकांनी मिळून महापालिका प्रशासनाला निवेदन देत साकडे घातले. या वेळी शिवराम पाटील, वीजय बांदल, अमोल कोल्हे, मतिन पटेल, संजय पाटील, अनिल नाटेकर, किरण ठाकूर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

Jalgaon
कंगना म्हणतेय, या न्यायालयावर माझा विश्वास नाही!

दीपककुमार गुप्ता यांनी महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त विद्या गायकवाड यांना निवेदन दिले. शहरातील रस्त्यांची स्थिती खराब झाली असून, यामुळे जळगावकरांना पाठीचे, मानेचे, मणक्यांचे विकार होत आहेत. त्यात अनेक लहान-मोठे अपघात होऊन हाता-पायाला देखील दुखापत होत आहे. इतर विकार होण्यापेक्षा आता आमच्या किडनी घेऊन, ती विक्री करून मिळालेल्या रक्कमेतून खड्डे दुरुस्त केले तर अनेकांना भविष्यात होणाऱ्या त्रासापासून दूर ठेवता येईल असे निवेदनात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com