गिरीश महाजनांनी सत्तेच्या मस्तीतून अत्यंत हीन पातळी गाठली!

गिरीश महाजन- एकनाथ खडसे यांच्यातील आरोपांनी राजकीय वातावरण गढूळ झाले.
Girish Mahajan & Eknath Khadse
Girish Mahajan & Eknath KhadseSarkarnama

जळगाव : आपल्या मुलाच्या बाबतीत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी अत्यंत खालच्या पातळीवरचे वक्तव्य केले आहे. त्यांना सत्तेचा माज आहे. त्या मस्तीतूनच त्यांनी अत्यंत खालचा दर्जा गाठला, अशा शब्दात माजी मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गिरीश महाजनांना फटकारले आहे. (Eknath Khadse says Girish Mahajan reached the most inferior level-sd67

Girish Mahajan & Eknath Khadse
Girish Mahajan on Eknath khadse : 'खडसेंच्या मुलाचं काय झालं, आत्महत्या की खून?'

श्री. महाजन यांनी ‘एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली कि, त्याचा खून झाला याच्या तपासाची आता गरज असल्याचे विधान आज पत्रकार परिषदेत केले होते. त्याचे पडसाद उमटले.

Girish Mahajan & Eknath Khadse
नाथाभाऊ तुमच्या घरचे काय जाते..उगाच खोडा घालू नका; महाजन,खडसेंमध्ये खडाजंगी

याबाबत एकनाथ खडसे म्हणाले, कि गिरीश महाजन यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जावून आपल्या मनोवृत्तीचे प्रदर्शन केले आहे. माझ्या मुलाचा मृत्यू झाला त्यावेळी मी पंधरा किलोमीटर लांब होतो. घरामध्ये रक्षा खडसे व मुलगा दोघेच होते, अशा परिस्थितीत संशय घेणे म्हणजे महाजन यांची मनोवृत्ती किती खालच्या दर्जाची आहे हे दिसून येत आहे.

ते म्हणाले, मी त्यांच्या मुलाबांळाविषयी बोललो नाही, तर घराणेशाही विषयी बोलले. त्यावेळी मी तुमच्या घरामध्ये साधनाताई या सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि पंधरा वर्षापासून नगराध्यक्ष आहेत. दुसरं कुणी नाही का?. तुम्हाला जर मुलगा असता, सून असती तर कदाचित तुम्ही त्यांना राजकारणात आणले असते. मुलाला मी आयुष्यमान भव असे शुभार्शिवाद दिले असते.

खडसे यांनी महाजन यांना प्रत्युतत्र देताना सांगितले की, दुर्दैवाने गिरीशभाऊ यांना मुलगा नाही. असता तर त्यांनी त्याला राजकारणात आणले असते, असे मी म्हणालो. गिरीशभाऊ यांना मी आणखी काही बोलू शकतो असे म्हटले आहे. त्यांनी बोलले पाहिजे. काहीही लपवता कामा नये. चाळीस वर्षाच्या राजकारणात मी कसा आहे?, काय आहे? हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे.

त्यातल्या त्यात जळगाव जिल्ह्यातील राजकारणात तर जनतेने मला जवळून पाहिले आहे. माझे कुणाशी संबध आहेत, कुणाबरोबर मी राहिलेलो आहे, हे सर्व जळगाव जिल्ह्याला माहिती आहे. अगदी मला गिरीश भाऊंचेही माहिती आहे. त्यामुळे जनता देखील ते पाहिलच. फर्दापूरच्या रेस्ट हाऊसमध्ये काय झाल? याच्या कथा आमच्या जिल्ह्यातील वृत्तपत्रांत महिनाभर रंगल्या. सुरा, सुंदरी अशा काही हेडलाईन त्या काळात वर्तमानपत्रात आल्या होत्या.

ते पुढे म्हणाले, त्या काळातील घटनांचा मी साक्षीदार आहे. कारण मी त्यावेळी फर्दापुरला गेलो होतो, अशा गोष्टी सांगता महाराष्ट्राच्या जनतेला येण्यासारख्या आहेत. अशा अनेक गोष्टी मला माहितीही आहेत. मात्र मला त्याबबत वेदना होतात. माझ्या मुलाच्या आत्महत्याविषयी त्यांनी असे बोलणे म्हणजे त्यांची एकतर त्यांची रक्षाताईवर संशयाची सुई असेल. या संदर्भात काय घडले याविषयी विनाकारण संशयाची सुई निर्माण करण्याचा त्यांचा हेतू दिसतो आहे.

गिरीशभाऊ देवेद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आहेत असे म्हटले जाते. केंद्रात मोंदीचे सरकार आहे, त्यामुळे त्यांनी याची सीबीआय चौकशी करावी आणि ‘दूध का दूध पाणी का पाणी करावे’ परंतु कुणाच्या भावना दुखावण्याचे काम करू नये. मी त्यांच्या भावना दुखावेल असे बोललोच नाही. केवळ मुलगा असता तर... असे म्हटले आहे. परंतु ते सत्तेचा माज आणि मस्तीतून असे वक्तव्य करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com