Jalgaon News: गुलाबरावांपुढे पुन्हा एकनाथ खडसेंचे चे आव्हान!

पालकमंत्री झालेल्या गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा एकनाथ खडसेंशी झुंजावे लागणार.
Eknath Khadse & Gulabrao Patil
Eknath Khadse & Gulabrao Patil Sarkarnama

जळगाव : शिवसेनेचे (Shivsena) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना दुसऱ्यांदा जळगाव (Jalgaon) जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे, मात्र यावेळी त्यांच्यासमोर विरोधी पक्ष (Opposition) म्हणून आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे आव्हान असणार आहे. या दोन्ही नेत्यांत फारसे सख्य यापूर्वीही नव्हते. त्यामुळे गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्याशी राजकीय खडाखड करावी लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्याचे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. (Jalgaon District politics will be on Gulabrap Patil & Eknath Khadse)

Eknath Khadse & Gulabrao Patil
Shivsena: सीबीआय चौकशीसाठी शिवसेनेचे चक्क स्मशानभूमीत उपोषण;

जळगावच्या राजकारणात एकनाथ खडसे यांचा दबदबा आहे. त्यांनी वेळोवेळी आपला प्रभाव दाखवून दिला आहे. विशेषतः जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांनी गिरीश महाजन यांची चांगलीच कोंडी केली होती. खडसे यांच्या डावपेंचापुढे गुलाबराव व खडसे यांना रिंगणाबाहेर पडावे लागले होते.

Eknath Khadse & Gulabrao Patil
शेतकरी संघटनेचा केंद्र सरकारविरोधात सत्याग्रहाचा बिगूल

एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात सत्ता असतानाही खडसे- पाटील यांचे राजकारण चांगलेच तापले होते. दोन्ही नेत्यांनी एकमेकांचा चांगलाच समाचार घेतला होता.

सध्या जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे यांच्या विरोधात त्यांचे सर्व विरोधक एकवटलेले दिसतात. अशा स्थितीत खडसे यांच्याशी गुलाबराव पाटील यांचे राजकीय सख्य सर्वश्रृत असल्याने त्यांच्यात वाद अपरिहार्य आहे. त्यामुळे अशा स्थितीत एकनाथ खडसे यांचे त्यांना मोठे आव्हान असेल. त्यामुळे आगामी काळात खडसे- गुलाबराव पाटील यांचा कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.

गुलाबराव विरुद्ध खडसे

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना जिल्ह्यात दुसऱ्यांदा पालकमंत्रिपद मिळाले आहे. मात्र यावेळी पाटील यांची मोठी कसोटी असेल. पाटील यांनी शिवसेनेत बंड (त्यांच्या शब्दात उठाव) करून शिंदेगटाची साथ केली आहे. आपले मंत्रिपद सोडून ते शिंदेगटात गेल्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळाले ही त्यांची जमेची बाजू आणि आता त्यांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही मिळाले आहे.

मागच्या वेळेपेक्षा यावेळी पाटील यांचा पालकमंत्रिपदाचा काळ कसोटीचा असणार आहे. बंड केल्यामुळे शिवसेनेचा त्यांना कडवा विरोध, तर यावेळी एकनाथ खडसे हे विरोधी आमदार असणार आहेत. त्या काळात खडसे भाजपतच होते, त्यामुळे त्यांचा विरोध नव्हता. मात्र आता ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. या पूर्वी खडसे यांनी नियोजन मंडळाच्या सभा गाजवून तत्कालीन पालकमंत्र्यांसमोर जिल्ह्याच्या प्रश्‍नांना वाचा फोडून पालकमंत्र्यासमोर प्रश्‍नांचे डोंगर उभे केले होते. त्यामुळे गुलाबराव विरुद्ध खडसे असा सामना आता नियोजन मंडळाच्या सभेत होईल, हे मात्र निश्‍चीत.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com