Jalgaon News : आयुक्तपदाचा तिढा सुटता सुटेना ; प्रशासकीय कामे खोळंबली!

Jalgaon News : आयुक्त पवार यांना काही अटी शर्ती, धोरणात्मक बाबीवर स्वाक्षऱ्या करता येईना!
Jalgaon Corporation
Jalgaon CorporationSarkarnama

जळगाव : जळगाव महापालिका आयुक्तपदाच्या निश्‍चितीची सुनावणी आता ९ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. ‘न्यायालय’ रजेवर असल्यामुळे काल (दि. 5 जानेवारी) सुनावणी न झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे तब्बल महिनाभरापासून निर्माण झालेला आयुक्त नियुक्तीचा प्रशासकीय तिढा कायम अद्यापही आहे.

जळगाव महापालिकेच्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांची नोव्हेंबर २०२२ मध्ये बदली करण्यात आली. त्यांच्या पदावर परभणी येथील मनपा आयुक्त देवीदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली. पवार यांनी जळगावात येवून आपल्या पदाचा पदभार तत्काळ स्वीकारला, मात्र डॉ.गायकवाड यांना कोठेही नियुक्ती देण्यात आलेली नाही, त्यामुळे बदली करण्यात आलेल्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेतली. त्यांच्या बदलीला ‘मॅट’ ने स्थगिती दिली, असे असले तरी गायकवाड यांना अधिकार न देता, आयुक्तपदाचे पवार यांनाच अधिकार देण्यात आले आहेत.

Jalgaon Corporation
Electiion : शिंदे-फडणवीसांनी दखल घेतली नाही; पाचही उमेदवार देऊ, ‘अन् मंग पुढची पुढं...’

परंतु त्यांच्यावर काही अटी शर्ती लादण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आयुक्तपदाचा पेच निर्माण झाला आहे. ‘मॅट’ मध्ये या पूर्वी सुनावणीच्या तीन तारखा पडल्या आहेत. गुरुवारी (ता. ५) सुनावणी होऊन निर्णय होईल अशी अपेक्षा होती, मात्र, आजही सुनावणी झालेली नाही. न्यायालयाला सुटी असल्याने सुनावणी येत्या ९ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढील तारखेला तरी निकाल लागेल या प्रतीक्षेत जळगावकरांना राहावे लागणार आहे.

Jalgaon Corporation
Delhi News : महापौरपदाची निवडणूक पुढे जाणार? सभागृहात 'भाजप-आप'मध्ये गदारोळ

महापालिकेत आयुक्तपदाची नियुक्ती निश्‍चित होत नसल्यामुळे अनेक कामे खोळंबली असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘मॅट’ने आयुक्त पवार यांना काही अटी शर्ती घातल्यामुळे धोरणात्मक काही बाबीवर त्यांना स्वाक्षऱ्या करता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मॅट’ ने याबाबत लवकर निर्णय देऊन जळगावातील प्रशासकीय तिढा सोडवावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com