Jalgaon Politics : जळगाव महापालिका आयुक्तपदाचा खो-खो चा खेळ

जळगाव महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड या जळगाव महापालिकेच अतिरिक्त आयुक्त होत्या.
Jalgaon Politics
Jalgaon Politics

Jalgaon Politics : जळगाव महापालिका आयुक्त नियुक्तीचा खो-खोचा खेळ सुरू आहे. आयुक्त विद्या गायकवाड यांची बदली करण्यात आली, त्या जागेवर परभणीचे आयुक्त देवीदास पवार यांनी पदभार घेतला,मात्र त्याच दिवशी विदया गायकवाड यांच्या बदलीस स्थगिती आली, त्यानतंर पवार रजेवर गेले, गायकवाड पदभार घेण्यास सायंकाळी येणार होत्या, मात्र आज (ता.२) रोजी सकाळी पदभार घेण्याचे त्यांनी निश्‍चीत केले, त्या सकाळी येण्याअगोदरच आपली रजा रदद करून देवीदास पवार हे रूजू झाले त्यांनी पुन्हा काम सुरू केले, आता विद्या गायकवाड शासनाकडून आदेशाच्या प्रतिक्षेत असून दुपारपर्यंत आदेश आल्यास त्या पदभार स्विकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

जळगाव महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड या जळगाव महापालिकेच अतिरिक्त आयुक्त होत्या. तत्कालीन आयुक्त डॉ.सतीश कुळकर्णी सेवानिवृत्त झाल्यानंतर सात महिन्यापूर्वी श्रीमती गायकवाड यांची शासनाने आयुक्तपदी नियुक्ती केली. मात्र बुधवारी (ता.३०) ला अचानक त्यांच्या बदलीचे आदेश आले.त्यांची कोठेही पदस्थापना न करता त्यांच्या पदावर परभणी येथील आयुक्त देवीदास पवार यांच्या नियुक्तीचे आदेशही शासनाकडून आले त्यानंतर गुरूवार(ता.१) रोजी पवार जळगाव येथे दाखल झाले व त्यांनी आयुक्तपदाचा पदभार घेतला यावेळी जळगावच्या आयुक्त प्रशासकीय प्रशिक्षणासाठी पुणे येथे होत्या. मात्र शासकीय आदेशानुसार पवार यांनी त्वरीत पदभार स्विकारला.

Jalgaon Politics
PCMC Politics : प्रशासक काळात चाललंय काय? १५१ कोटींच्या निविदेत 20 ते 25 कोटींचा भ्रष्टाचार

आपली कोठेही पदस्थापना न करता तसेच आपले म्हणणे विचारात न घेता एकतर्फी पदभार घेतल्यामुळे डॉ.विदया गायकवाड यांनी ‘मॅट’(महाराष्ट्र ॲडमिनीट्रेटीव्ह ट्रिब्युनल)येथे याचिका दाखल केली. त्यात सुनावणी होवून आयुक्त विद्या गायकवाड यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली. याबाबतचे आदेश दुपारी झाले मात्र आदेश सायकांळी प्राप्त झाले,त्यामुळे आयुक्त सायंकाळी पदभार घेण्यास येणार होत्या, मात्र त्यांनी शुक्रवार(ता.२)सकाळी पदभार घेवू असे सांगितले.

आयुक्त देवीदास पवार यांनी गुरूवारी (ता.१) काम केले, दुपारी साडेतीन वाजता एक दिवसाची वैयक्तीक रजा टाकून ते नांदेडकडे रवाना झाले. त्यामुळे आता डॉ.विदया गायकवाड या सकाळी पदभार घेणार हे निश्‍चीत झाले होते. मात्र आज शुक्रवार (ता.२)रोजी सकाळी वेगळेच नाट्य घडले रजेवर गेलेले देवीदास पवार रजा रद्द करून सकाळी दहा वाजताच कार्यालयात आले आणि त्यानी नेहमीप्रमाणे आपले कामकाज सुरू केले. त्यामुळे सर्व जण चक्रावले नेमके काय सुरू आहे. हे महापालिका अधिकारी व कर्मचारी आणि पदाधिकारी यांनाही कळले नाही.

याबाबत अधिक माहिती घेतली असता समजले कि,मॅट ची आयुक्त गायकवाड यांच्या बदलीला स्थगिती आहे, त्याचे आदेशही आले आहेत. मात्र त्यांनी पुन्हा पदभार घ्यावे असे आदेश शासनाकडून आलेले नाही. या तांत्रिक बाबीत पवार हे रजा रदद करून पुन्हा रूजू झाले, तर डॉ.विद्या गायकवाड या आपल्यापदाची स्थगिती ऑर्डर घेवून शासनाच्याकडे गेल्या आहेत. त्याची आर्डर दुपारपर्यंत येणार असल्याचे सांगण्यात येत आहे,त्यामुळे त्या सायंकाळी पदभार स्विकारणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता डॉ.विद्या गायकवाड आता पुन्हा रूजू होणार काय कडेच लक्ष आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com