Jalgaon Dudh Sangh Theft : ‘शिंदे-फडणवीस सरकारच्या दबावामुळे पोलिस गुन्हा दाखल करण्यास घाबरत आहेत’

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज आमदार एकनाथ खडसे यांची उपोषणस्थळी जावून भेट घेतली. शिवाय जळगाव पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची भेटही घेतली.
Jayant Patil-Eknath khadse
Jayant Patil-Eknath khadseSarkarnama

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्हा सहकारी दूध संघात (Dudh Sangh) अपहार नव्हे; तर चोरी झाली आहे. यामुळे तत्काळ गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. मात्र, पोलिस अधीक्षकांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला. (Jalgaon Milk Sangh Steal : Shinde-Fadnavis government put a lot of pressure on police : Jayant Patil)

जळगाव जिल्हा दूध संघात झालेल्या चोरीप्रकरणी कार्यकारी संचालकांनी तक्रार केली आहे. त्याला २४ तास उलटल्यानंतरही संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करून घेतला जात नाही. संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला जावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath khadse) हे गुरुवार (ता. १३ ऑक्टोबर) संध्याकाळपासून जळगाव शहर पोलिस कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज आमदार एकनाथ खडसे यांची उपोषणस्थळी जावून भेट घेतली. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. शिवाय जळगाव पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची भेटही घेतली.

Jayant Patil-Eknath khadse
‘रश्मी शुक्लांनी ६८ दिवस माझा फोन टॅप केला : फडणवीसांना भेटल्या त्याच दिवशी त्यांना क्लीनचिट’

पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्यावर प्रचंड दबाव आहे, त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात त्यांना भीती वाटत आहे, असे दिसतंय. पोलिस स्वतः च्या कर्तव्यात कमी पडत आहेत, आपले कर्तव्य टाळत आहेत, असे स्पष्ट करतानाच नव्याने आलेले सरकार कायदा कशा पद्धतीने धाब्यावर बसवत आहे, हे जळगाव चोरी प्रकरणावरून दिसत आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला.

Jayant Patil-Eknath khadse
जानकरांनी वाढविले भरणेंचे टेन्शन : राष्ट्रवादीचे प्रवीण माने इंदापूरमध्ये रासपचे उमेदवार?

दरम्यान २४ तास उलटूनही आरोपींवर गुन्हा दाखल होत नाही याचा अर्थ ज्यांच्यावर आरोप आहेत ते लोक फरार होण्यासाठी पोलिसांकडून दिरंगाई होत असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com