दूध संघ गैरव्यवहार; संशयितांचे संचालक मंडळाकडे बोट?

पोलिसांनी घेतलेल्या संशयीतांच्या जबाबातून प्रकार आला समोर
Jalgaon Milk federation
Jalgaon Milk federationSarkarnama

जळगाव : जिल्हा (Jalgaon) दूध संघ (Milk federation) अपहार प्रकरणात संचालक मंडळाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अटकेतील संशयित कार्यकारी अधिकारी मनोज लिमये (Managing director) यांच्यासह इतरांच्या जबाबात आलेले मुद्दे आणि तपासात उघड बाबींमुळे पडद्याआड असलेल्यांकडेच रोख असल्याचे पोलिससूत्रांकडून (Police) समजते. आता या प्रकरणात त्रयस्थ अर्जदारची एन्ट्री झाली असून, दूध संघातील माजी अधिकारी एन. जे. पाटील यांनी न्यायालयात अर्ज सादर केला आहे. (Arrested employees shown finger towards Director board)

Jalgaon Milk federation
राज्यपाल हटवा ठराव करणारे `हे` ठरले राज्यातील पहिले गाव!

भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जळगाव जिल्हा दूध संघाचे नेते यांच्यात गेले काही दिवस टोकाचा राजकीय संघर्ष सुरु आहेत. त्यामुळे हे प्रकरण काय वळण घेते याची सगळ्यांनाच सतत उत्सुकता आहे.

Jalgaon Milk federation
शिंदे गटाला मिळेना यश; नेते हतबल : दुसऱ्या फळीत लॉबिंग करूनही शिवसैनिक फुटेना

जळगाव जिल्‍हा दूध उत्पादक संघात अगोदर अफरातफर झाल्याचा अर्ज एका गटाने केला, त्याला काउंटर करण्यासाठी दुसऱ्या गटाने नोंदीमध्ये तफावत समोर आणली. तद्‌नंतर चोरीची तक्रार आली.

या सर्व प्रकरणात न्यूट्रल भूमिकेतून प्रकरण आपसांत मिटवून टाकण्याचा सल्लाही देण्यात आला होता. मात्र, दोन्ही गटांतर्फे पोलिसांवर आरेाप-प्रत्यारोप सुरू झाले. अर्जाची चौकशी करणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांची उचलबांगडी करण्यात आली. गुन्हा दाखल करवून घेत नाहीत म्हणून उपोषणही करण्यात आले. तद्‌नंतर उच्च न्यायालयातही अपील करण्यात आले. अखेर सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

जबाबातून मुद्दे उघड

दाखल गुन्ह्यात इत्थंभूत पुरावे, दस्तऐवज ताब्यात आल्यावर अटकसत्र राबविण्यात येऊन कार्यकारी अधिकारी मनोज लिमये, हरी पाटील, अनिल अग्रवाल आणि रवी अग्रवाल, चंद्रकांत पाटील, किशोर काशीनाथ पाटील अशा सहा संशयितांना अटक झाली. अटकेनंतर तपासात पोलिसांनी संकलित केलेले नमुने, आवश्यक दस्तऐवज आणि पुराव्यांच्या आधारावर संशयितांचे जाबजबाब नोंदवून पंचनामेही करण्यात आले. संशयितांनी पुरविलेली माहिती, प्राप्त दस्तऐवजाच्या आधारे तपासातील प्रगती पाहता चेअरमन मंदाकिनी खडसे व संचालक मंडळाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता पोलिससूत्रांनी दिलेल्या संकेतावरून स्पष्ट होते.

कॅन्टीन, पॅकेजिंगवालाही रडारवर

पोलिसांच्या माहितीनुसार, दूध संघात मुकेश निंबाळकर (शिवाजीनगर) यांना कॅन्टीनचे कंत्राट देण्यात आले होते, तर योगेश निंबाळकर तूप पॅकेजिंगचे काम करीत होता. यांसह प्रदीप पाटील या तिघांच्या नावे अखाद्य तूप घेतल्याच्या नोंदी सापडून आल्या आहेत. तपासाधिकाऱ्यांनी या तिघांचीही चौकशी केली आहे. प्रदीप पाटील याने मंगळवारी दुपारी तीनला लेखी अर्ज सादर करून माझा या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नसल्याचे सांगत पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, सी. एम. पाटील व हरी रामू पाटील यांना अटकसत्रापूर्वीच उचलून नेले होते. मात्र, दोघांनी प्रत्येकी २० हजार रुपये देऊन सुटका करून घेतल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com