महापौरांना १८ वर्षांनी मिळणार हक्काचे निवासस्थान!

जळगावच्या महापौरांना पहिल्यांदाच शासकीय निवासस्थान देण्याचा ठराव.
Jalgaon Mayor Jayshree Mahajan
Jalgaon Mayor Jayshree MahajanSarkarnama

जळगाव : जळगाव (Jalgaon) महापालिका स्थापनेच्या १३२ आणि महापालिका स्थापनेच्या १८ वर्षांनंतर जळगावचे प्रथम नागरिक महापौर शासकीय निवासस्थान घेणार आहेत. सोमवारी झालेल्या महासभेत त्याला मंजुरी मिळाली आहे.

Jalgaon Mayor Jayshree Mahajan
शिवसेना हवी तर भाजपने मुख्यमंत्रीपदाचा विचार सोडावा!

जळगाव नगरपालिकेला १३२ वर्षाचा इतिहास आहे, स्वतंत्र पूर्व काळात १८६२ मध्ये या नगरपालिकेची स्थापना झाली. तर २००३ मध्ये पालिकेचे जळगाव महापालिकेत रूपांतर करण्यात आल्यानंतर महापालिका स्थापन झाल्यावर पहिल्या महापौर पदाचा मान आशा कोल्हे यांना मिळाला. आजपर्यंत झालेल्या कोणत्याही महापौरांनी शासकीय निवासस्थानाची मागणी केली नाही किंवा सत्ताधारी गटातर्फे प्रस्तावही देण्यात आला नाही. महापालिका स्थापनेनंतर प्रथमच महापौर यांना शासकीय निवासस्थान द्यावे, असा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेना गटनेते नितीन लढ्ढा यांनी मांडला. सोमवारी ऑनलाइन महासभेत त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली.

Jalgaon Mayor Jayshree Mahajan
कितीही चौकशी करा, छळा.. घाबरणार नाही!

सभेच्या पीठासीन अध्यक्ष महापौर जयश्री महाजन होत्या. विरोधी भारतीय जनता पक्षाने या प्रस्तावाला मंजुरी दिली. पक्षाच्या नगरसेविका ॲड. शुचिता हाडा म्हणाल्या, की सर्वच महापालिकेत महापौर यांना शासकीय निवासस्थान आहे, त्यामुळे जळगावातही महापौर यांना शासकीय निवासस्थान देण्याच्या प्रस्तावाला आमचा पाठिंबा आहे. आज शिवसेनेचा महापौर असला तरी येत्या काळात आमचा भाजपचा महापौर होणार आहे. हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. जळगाव महापालिकेच्या मालकीचे शासकीय निवासस्थान एकूण सहा आहेत, त्यात एक जुने आहे, त्याचा वापर होत नाही. इतर पाच निवासस्थानात आयुक्त व उपायुक्त दर्जाचे अधिकारी राहतात. त्यामुळे आता महापौरांना कोणते निवासस्थान देण्यात येणार याकडे जनतेचे लक्ष आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com