जळगाव जिल्हा बॅंकेसाठी खडसे सज्ज ; रुग्णालयातून दाखल केला अर्ज

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) व त्यांच्या कन्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

जळगाव जिल्हा बॅंकेसाठी खडसे सज्ज ; रुग्णालयातून दाखल केला अर्ज
Eknath Khadse,Rohini Khadsesarkarnama

जळगाव : जळगाव जिल्हा बँक (Jalgaon District Bank) संचालकपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) व त्यांच्या कन्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एकनाथ खडसे सध्या मुंबई येथे रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यातर्फे सूचक म्हणून अतुल युवराज पाटील यांनी उमेदवारी दाखल केला आहे, मुक्ताईनगर विविध कार्यकारी सोसायटी गटातून खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनी जिल्हा महिला आणि मुक्ताईनगर विविध कार्यकारी सोसायटी गटातून अर्ज दाखल केला आहे. या शिवाय जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांनी बोदवड विविध कार्यकारी सोसायटी, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी इतर गटातून तर माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी ओबीसी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Eknath Khadse,Rohini Khadse
राष्ट्रवादीच्या आमदाराला भर चौकात फटके मारा ; राणे संतापले

जळगाव जिल्हा बँक निवडणूकीत भाजपसहित सर्वपक्षीय पॅनलची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, आता कॉंग्रेस पक्षाने घुमजाव करीत भाजप सोबत निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर करीत केला आहे. त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंगेस यांची महाविकास आघाडी करण्याची तयारी दर्शविली आहे. अन्यथा आपण स्वतंत्र निवडणूक लढवू ,अशी घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वपक्षीय पॅनलच्या बाबतीत पेच निर्माण झाला आहे.

Eknath Khadse,Rohini Khadse
पंकजा मुंडे दोन वर्षात साचलेल्या कोणत्या गोष्टींवर उद्या बोलणार!

ॲड. रोहिणी खडसे म्हणाल्या कि सर्वपक्षीय पॅनल करण्याबाबत वरीष्ठ स्तरावरील नेते निर्णय घेत आहेत. ते जो निर्णय घेतील तो आपणास मान्य राहिल. तर माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गुलाबराव देवकर म्हणाले की, जिल्हा बँकेत सर्व पक्षीय आघाडी कि महाविकास आघाडी याबाबत वरीष्ठ स्तरावर चर्चा सुरू असून त्याबाबत जो निर्णय होईल, तो आम्हाला मान्य असेल.

Related Stories

No stories found.