Jalgaon Dudh Sangh Election : एकनाथ खडसेंना मोठा धक्का; पत्नीचा मोठ्या मतांनी पराभव

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत खडसे यांचा गृहतालुका असलेला मुक्ताईनगरमधून मंदाकिनी खडसे यांना चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आव्हान दिले होते.
Mangesh Chavan-Mandakini Khadse
Mangesh Chavan-Mandakini KhadseSarkarnama

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्हा सहकारी दूध संघाच्या (Dudh Sangh) निवडणुकीत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा धक्का बसला आहे. खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) या निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ बरखास्त करण्यापूर्वी मंदाकिनी खडसे या संघाच्या अध्यक्ष होत्या. त्यामुळे खडसे गटाला हा झटका मानला जात आहे. (Jalgaon dudh Sangh Election : Eknath Khadse's wife defeated by huge votes)

भारतीय जनता पक्षाचे (BJP) चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी मंदाकिनी खडसे यांचा तब्बल ७६ मतांनी पराभव केला आहे. दूध संघाच्या निवडणुकीत आमदार चव्हाण यांना २५५ मते मिळाली आहेत, तर मंदाकिनी खडसे यांना १७९ मते मिळाली आहेत, त्यामुळे मोठ्या फरकाने झालेला हा पराभव खडसे यांच्या नामुष्कीजनक ठरला आहे.

Mangesh Chavan-Mandakini Khadse
Chandrakant Patil : कर्मवीरांचा अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना 'रयत'नेही सुनावलं

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत खडसे यांचा गृहतालुका असलेला मुक्ताईनगरमधून मंदाकिनी खडसे यांना चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आव्हान दिले होते. चव्हाण यांच्या पाठीशी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आणि त्याचे परिणाम निकालातून दिसून आले. निवडणुकीत खडसे यांनी महाजन यांना जिंकण्याचे आव्हान दिले हेाते. त्याला महाजन यांनी निकालातून उत्तर दिले आहे.

Mangesh Chavan-Mandakini Khadse
ठाकरे गटाच्या नेत्याकडून चक्क शिंदे गटातील आमदाराच्या पाठीवर कौतुकाची थाप! म्हणाले...

निवडणुकीपूर्वी जळगाव जिल्हा दूध संघावर एकनाथ खडसे यांचे संपूर्ण वर्चस्व होते. मंदाकिनी खडसे या संघाच्या अध्यक्ष होत्या. निवडणुकीपूर्वी जिल्हा दूध संघावरून मोठे महाभारत घडले होते. भाजपकडून दूध संघात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला हेाता. तर खडसे यांनी दूध संघात प्रशासकाच्या काळात चोरी झाल्याचा आरोप करून पोलिस ठाण्यासमोर एक रात्रभर उपोषण केले हेाते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मात्र खडसेंना धक्का बसला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com