जळगाव जिल्हा बँक : खडसेंचे पुन्हा वर्चस्व ; माघार घेतलेल्या महाजन विजयी

महाविकास आघाडी प्रणित सहकार पँनेल विजयी झाले. तर भुसावळ मध्ये भाजपचे आमदार अपक्ष उमेदवार संजय सावकारे विजयी झाले. एकनाथ खडसे यांनी (Eknath Khadse) पुन्हा एकदा आपली ताकत सिद्ध केली आहे.
Eknath Khadse
Eknath Khadsesarkarnama

जळगाव : जळगाव जिल्हा बँक (Jalgaon District Bank election) संचालक निवडणुकीत रावेर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात उलटफेर झाला माघार घेतलेल्या सहकार पॅनलच्या उमेदवार जनाबाई गोंडू महाजन या एका मताने विजयी झाल्या. ज्यांना पाठिंबा दिला ते अरुण पाटील पराभूत झाले.

दोन विविध कार्यकारी सोसायटीत महाविकास आघाडी प्रणित सहकार पँनेल विजयी झाले. तर भुसावळ मध्ये भाजपचे आमदार अपक्ष उमेदवार संजय सावकारे विजयी झाले. एकनाथ खडसे यांनी (Eknath Khadse) पुन्हा एकदा आपली ताकत सिद्ध केली आहे.

जळगाव जिल्हा बँक संचालक निवडणुकीचे आज मतमोजणी सुरू आहे. चार विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात महाविकास आघाडी प्रणित सहकार पँनेल विजयी झाले. रावेर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात सहकार पॅनल मधील उमेदवार जनाबाई गोंड महाजन यांनी जाहीर माघार घेऊन अपक्ष उमेदवार माजी आमदार अरुण पाटील यांना पाठिंबा दिला होता. मात्र उलटफेर होवून माघार घेतलेल्या सहकार पॅनल मधील जनाबाई महाजन या एका मताने विजयी झाल्या. त्यांना 26 मते मिळाली तर अरुण पांडुरंग पाटील यांना 25 मते मिळाली.

Eknath Khadse
लस घेतली तरच दुकाने उघडता येणार

इतर दोन विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात ही सहकार पॅनल विजयी झाले . यात यावल कार्यकारी सोसायटी मतदार संघात महविकास आघडी प्रणित सहकार पॅनलचे विनोद पंडित पाटील विजयी झाले, चोपडा विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात सहकार पॅनलचे घनश्याम अग्रवाल विजयी झाले, त्यांना 64 पैकी 63मते पडली एक मत बाद झाले.तर विरोधी उमेदवारांना शून्य मते पडली.

भुसावळ विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात भाजपचे आमदार व अपक्ष उमेदवार संजय सावकारे विजयी झाले. भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. आमदार सावकारे यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली, या ठिकाणी महाविकास आघाडीने त्यांच्या विरोधात उमेदवार उभा नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com