गिरीश महाजन साईडट्रॅक करून एकनाथ खडसेंनी जळगाव बँकेचे मैदान मारलेच!

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलला यश.
गिरीश महाजन साईडट्रॅक करून एकनाथ खडसेंनी जळगाव बँकेचे मैदान मारलेच!
Rohini Khadse & Gulabrao DeokarSarkarnama

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रारंभी भाजप नेते गिरीश महाजन यांना पॅनेलच्या वाटाघाटीत गुंतवले. त्यानंतर वेगळाच डाव टाकत बहिष्कार टाकला. या राजकीय डावपेचात महाजन यांना साईडट्रॅक करीत श्री. खडसे यांनी बँकेचे मैदान मारलेच. यानिमित्ताने जळगावच्या सहकारावर त्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवल्या ही निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलचे डॉ. सतीश पाटील (Dr Satish Patil) , माजी मंत्री गुलाबराव देवकर (Gulabrao deokar), अॅड. रोहिणी खडसे (Rohini Khadse) विजयी झाल्या. राखिव गटातील सहा मतदारसंघात देखील सहकार पॅनलने बाजी मारली आहे.

Rohini Khadse & Gulabrao Deokar
नगरसेविका संगीता गायकवाड यांनी केली नाशिक ते पंढरपूर सायकल वारी!

बँकेची मतमोजणी आज सकाळी झाली. यामध्ये सहकारी पॅनेलला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले आहे. इतर संस्थांच्या मतदारसंघात सहकार पॅनलचे माजी मंत्री गुलाबराव देवकर विजयी झाले. त्यांना १५०१ मते मिळाली. इतर मागासवर्ग मतदारसंघात सहकार पॅनलचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील विजयी झाले. त्यांना २३१६ मते मिळाली तर त्यांचे विरोधी विकास पवार याना २४२ मते मिळाली.

Rohini Khadse & Gulabrao Deokar
काँग्रेसच्या हिरामण खोसकरांची घोषणा, `गाव तिथे आमदार निधी उपलब्ध करू`

अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून सहकार पॅनलचे श्यामकांत सोनवणे विजयी झाले. त्यांना २४६४ मते मिळाली. व्ही. जे. एन. टी. मतदारसंघात सहकार पॅनलचे मेहताब सिंग नाईक विजयी झाले. त्यांना २३२८ मते मिळाली. महिला राखीव मतदारसंघात सहकार पॅनलचे उमदेवार विद्यमान चेअरमन अॅड. रोहिणी खडसे व शैलजा निकम विजयी झाल्या. श्रीमती खडसे यांना २२३५ मते मिळाली, तर श्रीमती निकम यांना १९२५ मते मिळाली आहेत.

जळगाव जिल्हा बॅंकेवर माहाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलने आपला झेंडा फडकवला आहे. सहकार पॅनलचे २१ पैकी २० उमेदवार निवडून आले आहेत. एका जागेवार अपक्ष भाजपचे उमेदवार आमदार संजय सावकारे निवडून आले आहेत. या निवडणुकीवर भारतीय जनता पक्षाने बहिष्कार टाकला होता.

...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in