मनपातील सत्ताधारी संभ्रमात..! शिंदे परतण्याची आशा

नगरसेवक म्हणतात, शिवसेनेतील बंडखोरी नव्हे, अंतर्गत नाराजी
मनपातील सत्ताधारी संभ्रमात..! शिंदे परतण्याची आशा
Jalgaon CorporationSarkarnama

जळगाव : शिवसेना (Shivsena) नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलेले नाही, त्यांनी केवळ नाराजी व्यक्त केली आहे. ते हाडाचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे ते परत येऊन शिवसेनेत सर्व व्यवस्थित होईल, अशी आशा महापालिकेतील (Jalgaon) शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केली. मात्र, श्री. शिंदे यांच्या भूमिकेमुळे महापालिकेतील सत्ताधारीही संभ्रमात असल्याची स्थिती आहे. (Jalgaon Corporators confident, Shivsena issue will Resolve)

Jalgaon Corporation
अखेर कन्फर्म झालं...एकनाथ शिंदेंसोबत ३७ आमदार, ठाकरे सरकार पडणार?

महापालिकेत भाजपची सत्ता होती. अडीच वर्षांनंतर भाजपचे तब्बल २७ नगरसेवक फोडून त्यांच्या पाठिंब्यावर शिवसेनेने सत्ता स्थापन केली होती. त्यात फुटलेल्या भाजप नगरसेवकामधील कुलभूषण पाटील यांना उपमहापौरपदही दिले आहे. महापालिकेतील सत्ता परिवर्तनात शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा होता. ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ एकनाथ शिंदे यांनी अत्यंत चालाखपणे राबविले होते. विशेष म्हणजे त्याची स्थानिक राजकीय नेत्यांना कल्पनाही येऊ दिली नाही.

Jalgaon Corporation
शिवसेनेतील संकटावर कृषिमंत्री दादा भुसेंची मात्रा उपयोगी पडेल?

जळगावकडे दिले लक्ष

सत्ताबदलानंतर त्यांनी जळगावच्या विकासकामांकडेही लक्ष दिले. त्यांनी जळगावच्या रस्त्यांसाठी तसेच इतर विकासकामासाठीही शंभर कोटीपर्यंत निधी दिला आहे. जळगावच्या विकासाबाबत कोणताही प्रश्‍न निर्माण झाल्यास सत्ताधारी मुंबईत एकनाथ शिंदे यांचीच भेट घेत असत आणि तेही जळगाव महापालिकेचे प्रश्‍न ताबडतोब सोडवित असतं.

मनपातील सत्तेवर परिणाम

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यामुळे महापालिकेतील राजकारणावर त्याचा निश्‍चित परिणाम होणार आहे. मात्र, सध्या तरी त्याबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाही. मात्र, श्री. शिंदे यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर न केल्यामुळे महापालिकेतील शिवसेनेचे सत्ताधारी व त्यांना साथ देणारे फुटीर नगरसेवकही आता संभ्रमात आहेत. सध्या तरी कोणीही काहीही बोलण्याच्या स्थितीत नाहीत. भाजपने फुटीर नगरसेवकांवर दाखल केलेली अपात्रतेची तक्रार अद्यापही नाशिक विभागीय आयुक्ताकडे सुनावणीस आहे. एकनाथ शिंदे यांना याची सर्व माहिती होती, ते नगरविकास मंत्री होते. त्यामुळे काही प्रमाणात सत्ताधाऱ्यांना आशा होती. मात्र, श्री. शिंदे यांनी बंडाची भूमिका कायम ठेवल्यास महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनाही निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी सत्ताधारी ‘वेट ॲन्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. विशेषत: शिंदे पुन्हा परत येतील व शिवसेनेत सर्व चांगले होईल अशी त्यांना आशा आहे.

...

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलेले नाही. त्यांनी पक्षापासून दूर होण्याची कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांची नाराजी दूर करतील व सर्व व्यवस्थित होईल, अशी आम्हाला खात्री वाटते.

-सुनील महाजन, विरोधी पक्षनेता, महापालिका

...

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. ते शिवसेना सोडून जाणार नाहीत. त्यांची नाराजी दूर होईल व पुन्हा शिवसेनेत येतील, याचा आम्हाला विश्‍वास आहे.

-कुलभूषण पाटील, उपमहापौर, जळगाव

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in