गनिमी कावा...माघार घेतलेल्या महाजन विजयी अन् पराभूताला स्वतःचे मतही नाही!

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल चर्चेचा विषय ठरला आहे.
Janabai Mahajan & Ghanshyam Agrawal
Janabai Mahajan & Ghanshyam AgrawalSarkarnama

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणुकीत रावेर गटातून जाहीर माघार घेतलेल्या सहकार पॅनलच्या जनाबाई महाजन या एका मताने विजयी झाल्या. त्यांच्या विरोधकांएव्हढाच स्वतः महाजन व त्यांच्या समर्थकांनाही तो आश्चर्याचा धक्का ठरला आहे.

Janabai Mahajan & Ghanshyam Agrawal
गिरीश महाजन साईडट्रॅक करून एकनाथ खडसेंनी जळगाव बँकेचे मैदान मारलेच!

जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. निकाल जाहीर झाल्यावर त्यातील अनेक निकाल चमत्कारीक होते. त्यात चक्क माघार घेतलेला उमेदवार विजयी झाला. एक गटात तर पराभूत उमेदवाराला स्वतःचे मत देखील मिळाले नाही. अर्थात त्यांनी स्वतः मतदान केले होते. त्यामुळे सहकारात विविध कार्यकारी सोसायटी गटात मतदान कसे व कोणाला मिळते हे सर्वश्रृत आहे. कदाचीत या उमेदवाराने पराभव दिसत असल्याने त्यातही स्वतः बरकत करून घेतली असावी, अशी चर्चा आहे.

सहकारातील हा चमत्कार चोपडा विविध सहकारी कार्यकारी संस्था गटात देखील घडला येथे घनश्‍याम अग्रवाल (चोपडा) यांना सोसायटी गटातून ६३ मते मिळाली. या गटात ६४ मतदार होते. त्यातील एक मत बाद झाले. याचा अर्थ खुद्द उमेदवार असलेल्या त्यांच्या विरोधकांना स्वतःचे मत देखील मिळाले नाही.

Janabai Mahajan & Ghanshyam Agrawal
माजी मंत्री सुभाष भामरेंच्या भावाचा दारूण पराभव: काँग्रेसच्या शरद पाटलांचा दणका

या निवडणुकीत रावेर विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात काँग्रेसच्या सहकार गटाच्या उमेदवार जनाबाई महाजन यांनी जाहीर माघार घेत अपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण पाटील यांना पाठिंबा दिला होता. प्रत्यक्ष मतदानात मात्र त्या एका मताने त्या विजयी झाल्या. त्यांना २६ मते मिळाली, तर पाटील यांना २५ मते मिळाली.

गनिमी काव्याने मिळाला विजय- महाजन

रावेर येथील विजयाबाबत, विजयी उमेदवार जनाबाई महाजन यांचे पती गोंडू महाजन म्हणाले कि, हा विजय आम्ही गनीमी कावा लढून मिळविला आहे. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राजीव पाटील यांनी पक्षाचा विश्‍वासघात केल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

हे आहेत विजयी उमेदवार...

या निवडणुकीत महाविकास आघाडीप्रणीत ‘सहकार पॅनल’ने २१ पैकी २० जागांवर एकतर्फी विजय मिळविला. यातील विजयी उमेदवार असे, एकनाथ खडसे (मुक्ताईनगर), प्रदीप रामराव देशमुख (चाळीसगाव), संजय मुरलीधर पवार (धरणगाव), रवींद्र प्रल्हाद पाटील (बोदवड), नाना राजमल पाटील (जामनेर), अनिल भाईदास पाटील (अमळनेर), घनश्‍याम अग्रवाल (चोपडा), जयश्री सुनील महाजन (जळगाव), किशोर धनसिंग पाटील (पाचोरा), चिमणराव रूपचंद पाटील (पारोळा), अमोल चिमणराव पाटील (एरंडोल), प्रताप हरी पाटील (भडगाव), जनाबाई गोंडू महाजन (रावेर), विनोद पंडितराव पाटील (यावल), संजय वामन सावकारे (भुसावळ), ओबीसी मतदारसंघ- डॉ. सतीश पाटील, इतर संस्था मतदारसंघ- गुलाबराव देवकर, विशेष मागास प्रवर्ग- मेहताबसिंग नाईक, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ- श्‍यामकांत सोनवणे, महिला राखीव- ॲड. रोहिणी खडसे (राष्ट्रवादी), शैलजादेवी निकम (काँग्रेस).

भाजपचे सावकारे एकमेव विरोधक

भारतीय जनता पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकत माघार घेतली असली, तरी भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचा अर्ज मात्र कायम होता. ते २६ मते मिळवून भुसावळ गटातून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी शांताराम धनगर यांना केवळ चार मते मिळाली. विरोधी गटात विजयी झालेले ते एकमेव उमेदवार आहेत.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in