Jalgaon APMC elections : गिरीश महाजन जिंकले मात्र खडसे हरलेले नाहीत!

बाजार समित्यांच्या निवडणुका जळगाव जिल्ह्यातील नेत्यांची पत उघड झाली.
Girish Mahajan & Eknath Khadse
Girish Mahajan & Eknath KhadseSarkarnama

डॉ. राहुल रनाळकर

Jalgaon APMC results : जळगाव जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांचे निकाल अपेक्षेप्रमाणेच आले. त्यात महाविकास आघाडीने राज्यात सत्ता असलेल्या भाजप आणि एकनाथ शिंदे गटाला घाम फोडला. त्यात गिरीश महाजन जिंकले, मात्र एकनाथ खडसे देखील हरले नाही. उलट यानिमित्ताने खडसेंचे विरोधक त्यांच्या जवळ आल्याचे चित्र दिसले. (Eknath Khdse`sopponent came closer to him)

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील राजकारणात राज्यातील सत्ताधारी (BJP) भाजप-शिंदे गटाचे (Eknath Shinde) पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) हे दोन मंत्री आहेत. त्यांना सातत्याने एकनाथ खडसे (Eknath Khadse) आव्हान देत असतात. बाजार समित्यांच्या निवडणुकीत देखील तेच पहायला मिळाले.

Girish Mahajan & Eknath Khadse
Nashik APMC : देविदास पिंगळे यांची शिवाजी चुंभळेंवर दणदणीत मात!

भुसावळ बाजार समितीत आमदार संजय सावकारे यांच्या पॅनलला यश मिळालं. मात्र त्यात एकनाथ खडसे पराभूत झाले असं म्हणता येणार नाही. कारण तिथे संतोष चौधरी यांचं पॅनल होतं. राजकारणात चौधरी-खडसे यांचं फारसं सख्य कधीच नव्हतं. राष्ट्रवादी म्हणून खडसे-चौधरी एका मंचावर दिसून आले. बोदवडचा निकाल काय लागतो, यावर एकनाथ खडसेंची राजकीय ताकद दिसून येईल, हे मात्र तेवढंच खरं.

पारोळ्यात चिमणराव पाटलांना बसलेला फटका तसा अनपेक्षित होता. गेल्या तीन टर्मपासून असलेली चिमणरावांची सत्ता माजी आमदार सतीश पाटील यांनी उलथवून लावली. चाळीसगावमध्ये मंगेश चव्हाणांनी वर्चस्व राखलं, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. नेहमीप्रमाणे गिरीश महाजन हे जामनेरचे सर्वेसर्वा ठरले. जळगाव बाजार समितीच्या रिंगणात कोणतेही गुलाबराव बाजी मारतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Girish Mahajan & Eknath Khadse
Malegaon APMC : पालकमंत्री दादा भुसे यांना पराभवाचा धक्का; अद्वय हिरे जिंकले!

जामनेरला भाजपचा चौकार

जामनेर बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. त्यांनी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. सर्वच्या सर्व १८ जागांवर विजय मिळवून त्यांनी चौथ्यांदा बाजार समितीची सत्ता पुन्हा मिळवली. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली होती.

जामनेरच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयी झालेल्या एकूण १७ उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे : समशेर गायकवाड ६३४, अशोक पाटील ६४६, राजमल भागवत ६३१, अशोक भोईटे ६१७, संगीता पाटील ६१०, उज्ज्वला वाघोडे ५५७, धनराज चव्हाण ५८२, महेश देशमुख ५७४, सुभाष पाटील ५७३, शिवाजी पाटील ५७२, पदमाकर पाटील ५४९, तुकडुदास नाईक ५४३, सुभाष शिनगारे ५३०, संजय देशमुख ६२२, चंद्रशेखर काळे ४८७, वासुदेव घोंघडे ६४७, सुनील कलाल ४८१ आणि तुकाराम निकम यांची आधीच बिनविरोध झाली होती.

Girish Mahajan & Eknath Khadse
Pimpalgaon APMC : दिलीप बनकर यांचा गड अभेद्य, ११ जागा जिंकल्या!

बाजार समितीच्या निवडणुकीचा नेमका अर्थ काय लावायचा, हा सध्या सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरत आहे. बाजार समितीची ही निवडणूक आगामी विधानसभेची रंगीत तालीम मानली गेली. या निवडणुकीत बहुतेक सगळे दिग्गज नेते मैदानात उतरलेले दिसून आले. विशेष म्हणजे, सगळ्यांनी अगदी त्वेषाने निवडणूक प्रचार केला. लक्ष्मी दर्शनासाठी मतदार सदैव उत्सुक असलेलं चित्र दिसून आलं. बऱ्याच ठिकाणी दोन्ही बाजूनं लक्ष्मी दर्शनाचा योग साधण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे क्रॉस वोटिंगही या निवडणुकीतील एक महत्त्वपूर्ण मुद्दा ठरला. या निवडणुकीत एवढा जोश असण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे, बऱ्याच वर्षांनी मोठ्या स्तरावरील व्यापक निवडणुका झाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com