सकाळी 6 पर्यंत काम केलं तर हा बाबा उठतो कधी ? झोपतात कधी ? ; अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं

ajit pawar : पटेल असं बोला ना राव.
eknath shinde,  ajit pawar
eknath shinde, ajit pawarsarkarnama

जळगाव : राज्यात सत्तातर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) हे यांनी कामाचा सपाटा लावला आहे. राज्यभर दौरे, हडीहंडी, गणेशोत्सवात नागरिकांच्या गाठी-भेटी ते घेत आहेत. 'ते २०-२० तास काम करतात,' असे त्यांच्या समर्थकांचे मत आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला लगावला होता. (ajit pawar latest news)

"अजितदादा हेही सकाळी सहा वाजल्यापासून कामास सुरवात करतात, ते उशीरापर्यंत कामे करीत असतात, अशा शब्दात सुळे यांनी त्यांना टोला लगावला आहे. आज (गुरुवार) विरोधीपक्षनेते अजित पवार यांनीही मुख्यमंत्र्याची खिल्ली उडवली. ते जळगाव येथे बोलत होते.

काही दिवसापूर्वी पैठण येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपण सकाळी 6 वाजेपर्यंत काम करत असतो, असे म्हणत अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्याला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. "सकाळी 6 वाजेपर्यंत काम केल तर हा बाबा उठतो कधी? झोपतात कधी?," असा सवाल करत अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंची खिल्ली उडवली. जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

अजित पवार म्हणाले, "मुख्यमंत्र्यांचे पैठण येथील भाषण मीही ऐकले. म्हणे मी सकाळी 6 पर्यंत काम करतो. 6 पर्यंत काम केलं तर हा बाबा उठतो कधी? 6 पर्यंत काम करतात तर मग झोपतात कधी? काही कळल पाहिजे ना. पटेल असं बोला ना राव. लयच पुढच बोलाय लागलेय,"

वेदांता प्रकल्पावरुन अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. "सध्या सरकारच्या सोयीने सगळं सुरु आहे, त्यामुळे आत थेट सरपंचापासून मुख्यमंत्र्यांचीही निवड करा," असा टोला पवारांनी शिंदेंना लगावला.

eknath shinde,  ajit pawar
Refinery Project : 'वेदांता' नंतर 'हा' प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर जाणार ? ; कंपनीकडून अल्टिमेटम ?

अजित पवार म्हणाले, "वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प भागीदारीतून महाराष्ट्रात 1 लाख 40 हजार रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होणार होती. महाराष्ट्रात पोषक वातावरण असताना हा प्रकल्प हलवला. या गुंतवणुकीसाठी गुजरातची निवड केल्याचं वेदांता समूहाने जाहीर केले आहे. त्यामुळे पूरक छोटे उद्योग, लाखोंचा रोजगार आणि कोट्यावधी रुपयांच्या महसूलाला महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. तरुणांनी या विरोधात पेटून उठलं पाहिजे,"

फुले-शाहुंच्या राज्यात ही गद्दारी चालणार नाही

"शिंदेंनी बंड केल्यानंतर सुरतला जाणाऱ्या आमदारांमध्ये औरंगाबाद, जळगाव येथील आमदार जास्त होते. शिंदे गटात गेलेल्या आमदारांना गद्दार म्हटलं की त्यांचे दाबे दणाणते. फुले-शाहुंच्या राज्यात ही गद्दारी चालणार नाही, गद्दारी करणारे पुन्हा निवडून येत नाहीत," असे पवार म्हणाले. "पुढील निवडणुकीत पाचोऱ्यात कोण निवडणूक येते, हे मी पाहणार आहे,"असा इशारा त्यांनी यावेळी दिला. "तुम्ही नवीन कामे करा, आमच्या योजनांना स्थगिती देऊ नका," असे अजित पवार यांनी शिंदे सरकारला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com