Jalgao Politics : जळगाव महापालिकेत गुलाबराव पाटील इन, शिवसेना आऊट!

जळगाव महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत १७ सप्टेंबरला संपणार असल्याने प्रशासकीय राजवट
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama

Jalgaon Corporation News: महापालिका नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १७ सप्टेंबरला पूर्ण होत आहे. मात्र, नवीन निवडणूक घेण्याबाबत अद्याप कोणतीही प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने भाजपची सत्ता खालसा करीत सत्तते आलेल्या शिवसेनेची सत्ता जाणार असुन तीथेपालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कलाने कराभार सुरु होईल, असे चित्र दिसते. (Jalgaon Municiple corporation`s elected body`s term will be over on coming 17th September)

जळगाव (Jalgaon) महापालिकेत सध्या शिवसेना (ठाकरे गट) (Uddhav Thackeray) सत्तते आहे. त्यांचा कार्यकाळ येत्या १७ जुलैला संपुष्टात येत आहे. राज्यासह तीथे निवडणुका (Election) होण्याची कोणतिही चिन्हे नाहीत. त्यामुळे प्रशासकांच्या माध्यमातून तीथे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gunabrao Patil) यांच्या कलाने कारभार होण्याची चिन्हे आहेत.

Gulabrao Patil
Hindu Politics : हिंदू जनआक्रोश मोर्चाला `शांती बंधूता पदयात्रे`ने प्रत्त्युत्तर

दर पाच वर्षांनी प्रथम महापालिकेची निवडणूक होते. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक होते. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघते. त्यामुळे राजकीय पक्षांच्या दृष्टीनेही या निवडणुकीचे मोठे महत्त्व आहे. महापालिकेत विजयी होणाऱ्या पक्षामुळे राजकीय वातावरणाचा नागरिकांचा कल दिसून येतो. त्या आधारवर पक्ष व इच्छुकही तयारी करतात.

१ ऑगस्ट २०१८ ला महापालिकेची निवडणूक झाली होती. ३ ऑगस्ट २०१८ ला निकाल जाहीर झाला होता. महापौर निवडीची पहिली सभा १८ सप्टेंबरला झाली होती. त्या सभेपासून पुढील पाच वर्षांची गणना होते. त्यामुळे १७ सप्टेंबर २०२३ ला विद्यमान नगरसेवकांचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होणार आहे. आता नगसेवकांचा कालावधी अडीच महिन्यांचा राहिला आहे.

Gulabrao Patil
Suhas Kande News : सुहास कांदे यांनी सांगितले मंत्रीपद न घेण्याचे कारण!

नवीन निवडणूक प्रक्रियाच नाही

नगरसेवकांची कार्यकाळ पूर्ण होत असल्याने नवीन निवडणुकांची नागरिकांनाही प्रतिक्षा आहे. नवीन निवडणुकीसाठी लोकसंख्येच्या आधारावर नवीन प्रभाग रचना करण्याची प्रक्रिया साधारणत: सहा ते सात महिने अगोदरच सुरू होते. मात्र, यंदा त्याबाबत कोणतेही आदेश नाहीत. महापालिका निवडणूक पुढे ढकलल्यास प्रशासकीय राजवट लागू होण्याची शक्यता आहे.

नाशिक, मुंबई, पुणे, पिंपरी- चिंचवड येथील महापालिकांची मुदत संपली आहे. त्यांच्याही निवडणुका न झाल्यामुळे त्या ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे. जळगाव महापालिकेची निवडणूक पुढे ढकलल्यास १७ सप्टेंबरपासून महापालिकेत आयुक्तांची प्रशासकीय राजवट लागू होईल. निवडणूक होईपर्यंत आयुक्तच कारभार पाहतील, अशी शक्यता आहे.

Gulabrao Patil
Dr. Bharti Pawar : गोदावरी एक्स्प्रेस पूर्ववत सुरु करण्यासाठी भारती पवार प्रयत्नशील!

लोकसभेनंतरच निवडणूक?

२०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. महापालिकेची निवडणूक लोकसभा झाल्यानंतरही होण्याची शक्यता आहे. शासनाने चार नगरसेवकांचा एक प्रभाग कायम ठेवला आहे. त्यानुसार ७५ प्रभागांची रचना कायम ठेवण्याचा निर्णय घेऊन निवडणूक झाल्यास लोकसभेअगोदर निवडणूक होऊ शकेल, अन्यथा लोकसभेनंतरच मनपा निवडणूक होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com