Dhule APMC Election News: आमदार जयकुमार रावल पॅनलचे दोघे बिनविरोध

Dhule Bazar Samiti News: दोंडाईचा बाजार समिती निवडणुकीत भाजप नेते जयकुमार रावल यांची लढत महाविकास आघाडीशी
Jaykumar Rawal
Jaykumar RawalSarkarnama

Jaykumar Rawal News: दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या एक दिवस आधीच महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आमदार जयकुमार रावल यांच्या जय किसान पॅनलच्या व्यापारी मतदारसंघाच्या दोन जागा बिनविरोध झाल्या. (Mahavikas Aghadi`s two candidates withdrawl from election)

दोंडाईचा (Dhule) बाजार समितीवर (APMC election) भाजपचे (BJP) नेते, माजी मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांच्या गटाची सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत त्यांची लढत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पॅनेलशी होईल. त्यादृष्टीने दोन्ही पॅनेलचे कार्यकर्ते प्रचारात उतरले आहेत.

Jaykumar Rawal
Sinnar APMC election News : माणिकराव कोकाटे विरूद्ध राजाभाऊ वाजे लढत!

दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणूक होत आहे. यातील व्यापारी मतदारसंघाच्या दोन जागांसाठी पाच उमेदवारी अर्ज दाखल होते. त्यात दोंडाईचाचे माजी नगराध्यक्ष नानाभाऊ मराठे, शशांक भावसार व अरुण चौधरी यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपपुरस्कृत रोशन रमेश टाटिया व राहुल कवाड यांचेच अर्ज राहिले. हे दोन्ही जय किसान पॅनलचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

Jaykumar Rawal
Raver APMC election news : बच्चू कडूंनी स्वतंत्र चुल मांडल्याने भाजपला चिंता!

दोंडाईचा बाजार समितीत आमदार रावल यांच्या पॅनलची विजयी सुरवात झाली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी सभापती नारायण पाटील, कामराज निकम, जिजाबराव सोनवणे, रमेश पारख, प्रवीण माळी यांच्यासह व्यापारी बांधवांनी या विजयाचा जल्लोष केला. व्यापारी बांधवांनी या दोन्ही जागा बिनविरोध करून आमदार रावल यांनी केलेल्या विकासावर विश्वास ठेवल्याची प्रतिक्रिया बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in