डॉ. सुवर्णा वाजे जळीत कांड: अटकेतील पती म्हणतो आम्हाला न्याय द्या!

या प्रकरणात अटकेतील आरोपीनेच नार्को टेस्टची मागणी केल्याने खळबळ
Dr Suvarna & Dr Sandip Vaje with burned car
Dr Suvarna & Dr Sandip Vaje with burned carSarkarnama

नाशिक : बहुचर्चीत महापालिका (NMC) वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे (Medical Officer Dr Suvarna Vaje) जळीत कांड प्रकरणात आता तपासात नेमके काय झाले याचीच चर्चा आहे. यासंदर्भात अटकेत असलेले संशयीत व डॅाक्टर पती संदीप वाजे यांनी काल आपली नार्को टेस्ट करावी, मात्र माझ्या पत्नीच्या खऱ्या खुन्याला शोधून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली. या मागणी खळबळ उडाली आहे.

Dr Suvarna & Dr Sandip Vaje with burned car
गृहमंत्र्यांची पोलिसांना शाबासकी; ६० दिवसांत बलात्काऱ्याला शिक्षा!

दरम्यान आरोपी डॅा संदीप वाजे यांना काल न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांच्या जामीनासाठी अर्ज करण्यात येणार असल्याचे त्यांचे वकील अॅड खातळे यांनी सांगितले. मात्र यावेळी त्यांनी आपल्या आशीलावर पोलिसांकडून अन्याय केला जात आहे. या प्रकरणाचा योग्य तपास लावून न्याय देण्याची मागणी डॅा. संदीप वाजे यांनी केली आहे. त्यासाठी आपली नार्को टेस्ट करावी अशी मागणी देखील त्यांनी केली. त्यामुळे या प्रकरणाला नेव वळण लागले आहे.

Dr Suvarna & Dr Sandip Vaje with burned car
कुलसचिव व मुलाची हत्या करून ९६ लाखांचे शेअर विकले

येथील सुवर्णा वाझे हत्या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे.डॉ.सुवर्णा वाजे हत्याकांड प्रकरणातील सुवर्णा वाजे यांचा पती मुख्य संशयित आरोपी संदीप वाझे यांनीच नार्कोटिक टेस्ट ची मागणी केली आहे..यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.सुवर्णा वाझे हत्या प्रकरणात त्यांचा पती संदीप वाझे यांना पोलिस कोठडी नंतर इगतपुरी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सूनवल्याने त्याला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहमध्ये रवाना केले आहे..तर पोलीस या प्रकरणात आपल्याला गोवत असल्याने नार्कोटिक टेस्ट करण्याची संदीप वाझे यांनी विनंती केली आहे.

यासंदर्भात अॅॅड खातळे म्हणाले, काही दिवसांपूर्वी जळालेल्या मारूती गाडीत सुवर्णा वाजे यांचा यांचा मृत्यूदेह संपूर्ण जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. तेव्हा पासून संदीप वाजे पोलिसांच्या रडारवर होते. त्यांना पोलिसांनी अटक केली. मात्र घटनेच्या दहा दिवसानंतर देखील काहीच तपास व पुरावे पोलिस सादर करू शकलेले नाहीत. यासंदर्भात वाजे यांनी आपली स्वताची नार्कोटेस्ट करण्याची मंगणी केल्याने संपूर्ण तपासावरच प्रश्न उपस्थित होत आहेत.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com