Shivsena:शिवसेना नेत्यांवरील हल्ल्यांच राजकीय हात कोणाचा?

शिवसेनेच्या कोकणेंवरील हल्लाप्रकरणातील अटक झालेले चौघे निघाले सराईत गुन्हेगार.
Jayant Naiknavre
Jayant NaiknavreSarkarnama

नाशिक : शिवसेनेचे (Shivsena) पदाधिकारी बाळा कोकणे (Bala Kokane) यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणात अखेर पोलिसांना (Police) हल्लेखोरांना अटक करण्यात यश आले आहे. अटक करण्यात आलेले चौघेही संशयित हे सराईत गुन्हेगार आहेत. अद्यापही या गुन्ह्यातील काही संशयित मोकाट असून, त्याचा शोध सुरू असल्याचे शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांनी सांगितले. (Police arrested four suspects in connection with Bala Kokane attack)

Jayant Naiknavre
Nashik News, बनकर, कोकाटे यांना लॅाटरी लागली, मात्र घरचे आव्हान पेलवणार का?

दरम्यान, या घटनेमागे ‘राजकीय’ हात असल्यामुळेच पोलिसांनी सावध भूमिका घेतल्याची चर्चा आहे. मनोज श्यामराव पाटील, पंकज सुधाकर सोनवणे, सागर सुदाम दिघोळे, सूरज ओमप्रकाश राजपूत यांना या प्रकरणात अटक करण्यात आली. हे चौघेही सराईत गुन्हेगार आहेत.

Jayant Naiknavre
Shivsena; शिवसेनेचा नाशिक महापालिकेसाठी ‘हंड्रेड प्लस’चा नारा!

शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश ऊर्फ बाळा कोकणे यांच्यावर १९ जुलै रोजी एम.जी. रोडवरील यशवंत व्यायामशाळेसमोर रात्री साडेदहा-अकराच्या सुमारास हल्ला झाला होता. दोन दुचाक्यांवरून आलेल्या सहा ते सात संशयितांनी लाकडी दांडक्याने मारून अंगावर काळी शाई फेकली होती. या प्रकरणात भद्रकाली पोलिसात अज्ञात हल्लेखोरांविरोधात प्राणघातक हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरील गुन्हा दाखल होऊन दहा दिवस होत आले तरीही संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश येत नव्हते. त्यामुळे शनिवारी शिवसेनेतर्फे पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. तसेच, संशयितांना अटक होत नसल्याने शिवसेनेने पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचाही आरोप केला होता. या इशाऱ्यानंतर काही तासातच पोलिसांनी अखेर दहा दिवसांनी चारही संशयितांना गडकरी चौक परिसरातून अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त संजय बारकुंड यांनी दिली.

चर्चा मात्र वेगळीच...

गेल्या दहा दिवसांपासून पसार असलेले संशयितांची माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे असतानाही पोलिस मात्र संशयितांना अटक करीत नसल्याचा आरोप पोलिसांवर होत होता. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचीही चर्चा होती. चारही संशयित हे पोलिसात स्वत:हून हजर झाल्याचे बोलले जात असताना अटक केल्याचा दावा पोलिस करीत आहेत. तसेच, संशयित हे सराईत गुन्हेगार आहेत. संशयित मनोज पाटील, पंकज सोनवणे याच्यावर खुनाचे गुन्हे दाखल असून, चौघांवरही खंडणी, प्राणघातक हल्ल्यासारख्या गंभीर स्वरूपाचेही गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सराईत गुन्हेगार असलेल्या या संशयितांना सदरील हल्ल्याची ‘सुपारी’ देण्यात आली होती का, की, कोणाच्या सांगण्यावर हा हल्ला झाला अशीही चर्चा होत आहे. नाशिक रोडला शिंदे गटाने लावलेल्या फलकावरील शाईफेकीमुळेच हा हल्ला झाला असावा, अशीही चर्चा आहे. अद्यापही या हल्ल्यातील सूत्रधार अटक नसल्याने व अटक संशयितांच्या चौकशीतून काय माहिती समोर येते, याकडे आता लक्ष लागले आहे.

मगर यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न?

शिवसेनेच्या महिला पदाधिकारी शोभा मगर त्यांच्या निवासस्थानावर अज्ञात जमावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केल्याची माहिती उपायुक्त बारकुंड यांनी दिली. मगर यांच्या माहितीनुसार त्यांच्या घराजवळ काही महिला व दोन पुरुष आले होते. ते तेथेच काही वेळ थांबले होते. मात्र उद्देश स्पष्ट नसला तरी ते हल्ला करण्यासाठी आले असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

-------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in