नाशिकमध्ये मोगलाई आली आहे काय?

नाशिक शहरात महिलेवर बलात्काराची घटना घडली.
Devendra Phadanvis
Devendra PhadanvisSarkarnama

नाशिक : नाशिक शहरात महिलेवर बलात्काराची (Rape In Nashik) घटना घडली. यातील दोषींवर पोलिसांनी कारवाई करावी म्हणून भाजपच्या (BJP MLA Deemanded Action) आमदार तसेच कार्यकरर्त्यांनी पोलिसांकडे मागणी केली. त्यासाठी आंदोलन केले. (BJP Workers Agitation) तर त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांचा हा पराक्रम पाहून नाशिकमध्ये (Nashik) मोगलाई (Mughal Rule) आली आहे काय? असा प्रश्न पडतो, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Phadanvis) यांनी म्हटले आहे.

Devendra Phadanvis
बलात्काराचे राजकारण आमदार सीमा हिरेंना पडले महागात!

यासंदर्भात ते म्हणाले, नाशिक शहरातील अंबड पोलिस ठाण्यांतर्गत ब्युटी पार्लरमध्ये शिरून बलात्कार करणार्‍या आरोपीवर कठोर कारवाई करा, यासाठी ठिय्या आंदोलन करणार्‍या भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्याचा पराक्रम नाशिकच्या पोलिसांनी केला आहे.

आरोपीवर कठोर कारवाई करणे सोडून पीडितेसाठी न्याय मागणार्‍यांवर गुन्हे आणि तीही इतकी कलमे दाखल केली गेली. न्याय मागण्यासाठी ठिय्या आंदोलन हा काय गुन्हा आहे का? त्यामुळे नाशिकमध्ये मोगलाई आली आहे का? असेही ते म्हणाले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com