कृषीमंत्री दादा भुसेंना एकनाथ शिंदे यांनीच ठाकरे गोटात ठेवले होते?

मालेगाव परिसरातील दादा भुसे समर्थकांचे स्टेटस, ‘जिथे तुम्ही, तिथे आम्ही’
कृषीमंत्री दादा भुसेंना एकनाथ शिंदे यांनीच ठाकरे गोटात ठेवले होते?
Eknath Shinde News, Dada bhuse NewsSarkarnama

मालेगाव : राज्याचे (Mahavikas Aghadi) कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांची शिवसेनेतील (Shivsena) बंडाबाबत भूमिका काय? ही उत्सुकता काल शमली. मुंबईत ठाण मांडून बसलेले कृषीमंत्री दादा भुसे तीन दिवसाच्या प्रतिक्षेनंतर अखेर शिंदे यांच्या गोटात सामील झाले. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडीयावर ‘जिथे तुम्ही, तिथे आम्ही’ असे स्टेटस ठेवून भुसे यांच्या पाठीशी असल्याचा संदेश दिला आहे. (Dada Bhuse supporters back him for Rebel move)

Eknath Shinde News, Dada bhuse News
नॅाट रिचेबल भास्कर जाधव गुवाहटीच्या मार्गावर?

एकनाथ शिंदे व भुसे यांच्यातील मैत्रीपुर्ण संबंध राज्याला सर्वश्रूत आहेत. यातच ठाणे येथील खासदार राजन विचारे हे भुसे यांचे व्याही, श्री. शिंदे यांचे तरुणपणाचे मित्र आहेत. या दोघांची दृढ मैत्री धर्मवीर चित्रपटातून सर्वांसमोर आली. त्यातच श्री. विचारे हे भुसे यांचे व्याही व आप्तेष्ट असल्याने शिंदे यांच्या समवेत भुसे पहिल्या फळीत असतील, असा अंदाज होता. (Dada Bhuse News in Marathi)

Eknath Shinde News, Dada bhuse News
एकनाथ शिंदे परत या...सोलापूरच्या महिला नेत्या ढसाढसा रडल्या!

मात्र, तीन दिवस ते सातत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रत्येक बैठकीत सहभागी झाले. आदित्य ठाकरे सारथ्य करीत असलेल्या गाडीतून हॉटेलकडे जातांनाही ते दिसले. यानंतर श्री. भुसे, श्री. राठोड यांनी मुख्यमंञ्यांना श्री. शिंदे यांचा प्रस्ताव दिल्याची चर्चा होती. त्या पार्श्‍वभूमीवर श्री. भुसे जाणूनबुजून मुंबईत थांबले की त्यांना थांबविले गेले या विषयी मोठी उत्सुकता व चर्चा होत आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरीत होवून शिवसेनेच्या मुशीत वाढलेल्या श्री. भुसे यांची द्विधा मनस्थिती होती. शिवसेनेने सामान्य कार्यकर्ते असताना सर्वकाही दिले. याउलट श्री. शिंदे यांच्याशी असलेले मैत्रिपूर्ण संबंध गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्याकडून झालेली मोलाची मदत, विकासकामांसाठी या पार्श्‍वभूमीवर काय निर्णय घ्यावा, याबाबत त्यांच्या मनात संभ्रम होता.

शहरातील मावळते उपमहापौर निलेश आहेर, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, माजी तालुकाप्रमुख संजय दुसाने, सुनील देवरे, रामा मिस्तरी आदींसह नऊ ते दहा निवडक पदाधिकारी बुधवारी मुंबई येथे गेले. त्यांनी श्री. भुसे यांना आपण जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल. तुमच्या सद्‌सदविवेक बुद्धीला स्मरुण निर्णय घ्या. आम्ही तुमच्या पाठीशी राहू, असा दिलासा देत आज माघारी फिरले.

श्री. भुसे बुधवारी रात्री उशिरापर्यंत सर्वांच्या संपर्कात होते. मंत्रीमंडळाच्या अखेरच्या बैठकीतही सुभाष देसाई, उदय सामंत यांच्यासह त्यांची उपस्थिती होती. गुरुवारी सकाळपासूनच मात्र ते नॉट रिचेबल होते. माजीमंत्री संजय राठोड, रवींद्र फाटक यांच्यासह ते शिंदे यांच्या गोटात दाखल होण्यासाठी गुवाहटीला रवाना झाल्याचे खात्रीलायकरित्या समजले. श्री. भुसे यांच्या शिंदे गोटात सामील होण्याच्या निर्णयामुळे येथील शिवसेनेचा बुरुज ढासळला आहे. पक्षनिष्ठा की मित्रप्रेम यात मित्रप्रेमाला प्राधान्य देत काळाची पावले ओळखून श्री. भुसे यांनी शिंदे यांच्या समवेत जाण्याचा निर्णय घेतला.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in