राष्ट्रीय कुटुंब आरोग्य अहवालात जैन समाजावर अन्याय?

केंद्र शासनाने हा अहवाल तातडीने रद्द करण्याची मागणी सकल जैन समाजातर्फे करण्यात आली आहे.
Dr Bharti Pawar with Jain Community.
Dr Bharti Pawar with Jain Community. Sarkarnama

नाशिक : नुकताच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य अहवाल (National family health Report) हा जैन समाजावर (Jain Community) अन्याय करणार आहे. त्यामुळे हा अहवाल तातडीने रद्द करावा, अशी मागणी येथील सकल जैन समाजातर्फे करण्यात आली आहे. (Centre should cancel the National family health Report)

Dr Bharti Pawar with Jain Community.
`एसटी`चे तुघलकी फर्मान; ज्येष्ठांच्या सवलतीचे वय ६५ वर्षे!

याबाबत समाजाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, या अहवालात काही आक्षेपार्ह बाबींचा उल्लेख आलेला आहे. त्यावरून काही प्रसार माध्यमांनी तसे वृत्त देखील प्रसिद्ध केले आहे.

Dr Bharti Pawar with Jain Community.
मनसे नेत्यांना अटक करणारी महिला पोलिस लाच घेताना अटक!

या अहवालातील माहितीमुळे जैन समाजाची प्रतिमा मलिन होत आहे. जैन समाज हा अहिंसावादी व शाकाहारी आहे. ‘जिओ और जिने दो’ या तत्त्वावर चालणारा आहे. त्यामुळे हा अहवाल रद्द करून पुन्हा नव्याने सर्व्हेक्षण करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

दि जैन ग्लोबल महासभेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष पारस लोहाडे, जीतो नाशिकचे अध्यक्ष पारस साखला, नामको सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सचिव शशिकांत पारख, जैन सोशल ग्रुप इंट फेडरेशनचे राज्य अध्यक्ष सचिन शाह, श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र गजपंथच्या विश्‍वस्त मंजूषा पहाडे, सहसचिव मनोज पाटणी, महावीर इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष अनिल नहार, रविवार कारंजा स्थानकाचे सुभाष भंडारी यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.

दरम्यान, याबाबत लवकरच संपूर्ण माहिती घेऊन आपण सर्वांसमोर मांडू असे आश्वासन डॉ. सौ. पवार यांनी या वेळी दिले. सरकारच्या वतीने आपण समाजाची माफी मागत असल्याचेही त्यांनी नमुद केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com