Jalgaon corporation Building

Jalgaon corporation Building

Sarkarnama

भाजपचा व्हीप नाकारणाऱ्या २९ नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस

जळगावच्या नगरसेवकांना हा राजकीय धक्का असल्याने चर्चेचा विषय आहे.

जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) २९ नगरसेवकांना नाशिक विभागीय आयुक्तांनी (State Government) अपात्रतेची नोटीस बजावली आहे, सदस्य दिलीप पोकळे, कुलभूषण पाटील यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. या नोटीसमुळे जळगावच्या (Jalgaon) राजकारणात खळबळ उडाली आहे.

<div class="paragraphs"><p>Jalgaon corporation Building</p></div>
नाशिकच्या शिवसेनेला कोरोनाची नव्हे तर निवडणुकीची भिती?

जळगाव महापालिकेत महापौर, उपमहापौर निवडीच्या वेळी भाजपचे २७ नगरसेवक फुटले त्यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला. दिलीप पोकळे हे गटनेते नियुक्त केले. त्यानंतर प्रभाग समिती सभापती निवडीत त्यांनी आपलाच पक्ष भाजप असून आपण दिलेल्या उमेदवारास मतदान करावे, असा व्हीप भाजप नगरसेवकांना बजावला. मात्र भाजप नगरसेवकांनी तो व्हीप स्वीकारला नाही. त्यामुळे दिलीप पोकळे यांनी नगरसेवक सीमा भोळे यांच्यासह २९ नगरसेवकांना अपात्र करावे अशी तक्रार पक्षाचे गटनेते म्हणून नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे केली.

<div class="paragraphs"><p>Jalgaon corporation Building</p></div>
भाजप म्हणते नाशिकमध्ये जिहाद, मात्र पोलिसांचे दुर्लक्ष!

या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी २९ भाजप नगरसेवकांना नोटीस बजावली असून ११ जानेवारीला दुपारी ११ वाजता नाशिक येथे सुनावणी होणार आहे. यात महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना उपस्थित राहण्याचे कळविले आहे.

आज ठरणार गटनेते

भारतीय जनता पक्षाचे फुटलेले नगरसेवक दिलीप पोकळे यांनी आपलाच भाजप गट असून आपणच गटनेते असल्याचा दावा केला आहे. त्यावर भाजप गटनेते भगत बालांनी यांनी आक्षेप घेतला असून भाजप गटनेते आपणच आहोत, असे म्हटले आहे. त्यावर औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती गडकरी यांच्यासमोर सुनावणी सुरू असून त्याचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे.

मी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आलो आहे. मी पक्षाचा गटनेता आहे. प्रभाग समिती सभापती निवडीत मी बजावलेला व्हीप नगरसेवकांनी नाकारला त्यामुळे आपण त्यांना अपात्र करण्याची तक्रार दिली, त्यानुसार विभागीय आयुक्तांनी नोटीस बजावली.

- दिलीप पोकळे, भाजप गटनेते, दावेदार.

.....

आम्हाला अद्याप कोणतीही नोटीस मिळाली नाही, मिळाल्यावर आम्ही आमचे म्हणणे मांडू. मात्र फुटीर नगरसेवकांच्या या उलट्या बोंबा आहेत.

- भगत बालानी, गटनेता, भाजप जळगाव महापालिका.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com