Shocking; अखाद्य तुपाच्या राजमलाई चॉकलेटची राज्यभर विक्री

बालकांच्या जिवाशी खेळ तरीही अन्न व औषध प्रशासन निद्रिस्त.
Chocolate
ChocolateSarkarnama

जळगाव : जिल्‍हा (Jalgaon) दूध (Milk federation) उत्पादक संघातील अपहारप्रकरणात दाखल गुन्ह्यात (FIR) आतापर्यंत शहर पोलिसांनी (police arrest six persons) सहा संशयितांना अटक केली आहे. एकाला अगोदरच जामीन झाला आहे. अटकेतील अग्रवाल यांच्याकडून अखाद्य तुपाचा वापर लहानमुलांमध्ये प्रसिद्ध राजमलाई नावाच्या चॉकलेट मध्ये चॉकलेट बेस म्हणून विकण्यासाठी केला जात होता. (Jalgaon District milk federation inedible ghee scham)

Chocolate
काँग्रेसने केले राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचे वस्त्रहरण!

चॉकलेट निर्मितीसाठी अखाद्य तुपाचा वापर होत असल्याचे दूधसंघाच्या प्रकरणातून उघडकीस आले असताना राज्याचे अन्न व औषध प्रशासनाने मात्र याबाबत अजूनही पुढाकार घेतलेला नाही की त्यांनीही झोपेचे सोंग घेतले आहे याची जनतेला उत्सुकता आहे.

Chocolate
जितेंद्र आव्हाडांवरील कारवाई सरकारवरच उलटली!

दूध संघाच्या अपहारात अटकेतील संशयित आरोपी रवी मंदनलाल अग्रवाल हे कैलादेवी कुटीर उद्योग नावाने राजेमलाई चॉकलेट ब्रॅण्डने चॉकलेट उद्योग चालवत आहे. विठ्ठल रुक्मिणी एजन्सीच्या माध्यमातून दूधसंघातून मिळवलेले अखाद्य तूप खरेदी करत होते. Not For Human Use (मानवी वापरास निषिद्ध) असल्याचे त्यांना माहिती असूनही मानवी आरेाग्यास धोका संभवणारे तूप त्यांनी खरेदी करून त्यातून राजमलाई या ब्रॅण्डची चॉकलेट निर्मिती करून ती अख्ख्या महाराष्ट्रात विकली.

कार्यकारी अधिकारी तथा संशयित आरोपी मनोज लिमये, हरी पाटील अनिल अग्रवाल आणि रवी अग्रवाल यांना याबाबत कल्पना होती. असे असताना अटकेतील संशयितांनी जाणीवपूर्वक खाण्यास अयोग्य अशा तूपातून बनविलेली चॉकलेट उत्पादन आणि विक्रीस प्रोत्साहन देऊन राज्यातील गोरगरीब चिमुरड्यांचे आरोग्य धोक्यात आणल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. त्याच अनुषंगाने पोलिस आता या प्रकरणात सखोल तपासात गुंतले आहेत. दूधसंघाच्या या प्रकरणात अनेक बड्या नेत्यांना जेलवारी संभवते असेही बोलले जात आहे.

तपासातील लेखा-जोखा

कोणतीही पावती दिली जात नव्हती, नातेवाईकामार्फत मिळत असलेले टेंडरही रडारवर आहे. संशयित आरोपी रवी अग्रवाल हा हरी पाटील यांच्याकडून घेत असलेल्या अखाद्य (बी ग्रेड) तूपाबाबतची पूर्ण कल्पना असताना मोठया प्रमाणात या अखाद्य तुपाची खरेदी करत होता. त्यांना कोणत्याही प्रकारची पावती दिली जात नव्हती. ती का दिली जात नव्हती?, या मागचे कारण काय व हे करण्यास कोण भाग पाडत होते? याचा तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

प्रमुख सुत्रधार चंद्रकात (सी.एम.) पाटील याचा नातेवाईक किशोर काशीनाथ पाटील याच्या नावावर विठ्ठल रुक्मिणी एजन्सी चालवली जात होती. ही एजन्सी घेण्यामागे त्यांचा नेमका काय उद्देश काय? चंद्रकांत मोतीराम पाटील प्रशासक मंडळाच्या महत्वाच्या पदावर असताना त्यांना असे, गैरकृत्य करण्यास कोणी प्रवृत्त केले किंवा आदेशित केले यासह त्याचे साथीदार कोण आहेत?, याचा शोध घेतला जात आहे.

सहा डबे तूप जप्त

अटकेतील संशयित अनिल अग्रवाल याने दूध फेडरेशनमधून घेतलेल्या अखाद्य तुपाबाबत कबुली देत निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिर परीसरातून हे तुपाचे डबे जप्त करण्यात आले. तपासाधिकारी उपअधीक्षक संदिप गावित त्यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी, रवींद्र पाटील, ओम सोनी यांनी रितसर पंचनामा करुन तूप जप्त केले असून तपासणीसाठी प्रयेागशाळेत पाठवले जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com