Balasaheb Thorat News : थोरांताविषयी इंदुरीकर महाराज असं काय बोलले की त्याची चर्चा रंगलीय

Indurikar Maharaj : ''क्षेत्र कोणतेही असो आपला माणूस हा आपला स्वाभिमान असतो...''
Indurikar Maharaj
Indurikar Maharaj Sarkarnama

Ahmednagar News : नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या दरम्यान अनेक राजकीय घडमोडी घडल्या. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी करत निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. मात्र, याच दरम्यान सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांना पक्षाने निलंबित केलं. त्यावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले.

यानंतर काँग्रेसचे (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा आपल्या पक्षश्रेष्ठींकडे दिला. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. असे असतानाच आता कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) बाळासाहेब थोरात यांच्याबाबत मोठे विधान केले आहे.

''कोणत्याही दगडाची मूर्ती होत नाही. जी दगडं घाव सहन करतील तीच मूर्तीसाठी वापरली जातात. ज्यांच्यात घाव सहन करण्याची ताकद आहे त्यांना यश निश्चित मिळतं'', असं इंदुरीकर महाराज थोरातांविषयी बोलताना म्हणाले. ते संगमनेरमध्ये (Sangamner) आयोजित कीर्तनात बोलत होते.

Indurikar Maharaj
Chandrakant Khaire News : बोरनारे यांनी लोकांना पैसे देवून सभेत घुसवले ; खैरेंचा थेट आरोप..

इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) पुढे म्हणाले, ''अपघात टाळण्यासाठी व्यसन करू नये. त्याचबरोबर वेगाची मर्यादा राखावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलवर बोलणंही टाळलं पाहिजे, असा सल्ला देत''बाळासाहेब थोरातांचा १०० वा वाढदिवस देखील आपल्याकडून व्हावा. यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना करावी. क्षेत्र कोणतेही असो. आपला माणूस हा आपला स्वाभिमान असतो'', असं ते म्हणाले.

Indurikar Maharaj
Smriti Irani News : राहुल गांधींच्याविरोधात स्मृती इराणी मैदानात; म्हणाल्या...

''अंधश्रद्धेला थारा देऊ नका. प्रत्येकाने शुद्ध आचार व शुद्ध आहार ठेवणं गरजेचं आहे. देवपण येण्यासाठी मोठे कष्ट सोसावे लागतात. आमदार बाळासाहेब थोरात हे सर्व सर्वमान्यांचे नेतृत्व आहे. थोरातांना एक वाक्य बरोबर लागू होतं ते म्हणजे, जी दगडं घाव सहन करतात तीच दगडं मूर्तीसाठी उपयोगी पडतात. कोणत्याही दगडाची मूर्ती होत नाही. जी दगडं घाव सहन करतील तीच मूर्तीसाठी वापरली जातात. ज्यांच्यात घाव सहन करण्याची ताकद आहे त्यांना यश निश्चित आहे'', असं सूचक विधान यावेळी त्यांनी केलं.

Indurikar Maharaj
Ajit Pawar : अश्लील नृत्यांच्या कार्यक्रमांना यापुढं थारा नाही; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना अजित पवारांचा इशारा

दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी बाळासाहेब थोरातांबाबत केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा रंगली आहे. यावेळी व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, रणजीत सिंह देशमुख, डॉ.जयश्री थोरात यांच्यासह आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com