Yeola Bazar Samiti News: येवला बाजार समितीत भुजबळांनी बाजी मारली, शिवसेनेला बाजूला ठेवत राष्ट्रवादीचाच सभापती

Nashik Politics| बेरजेच्या राजकारण आणि बाजार समितीच्या निकालाने छगन भुजबळांची ताकद आणखी वाढली.
Yeola Bazar Samiti News:
Yeola Bazar Samiti News: Sarkarnama

Yeola Bazar Samiti : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपले वर्चस्व कायम ठेवलं आहे. सहकार नेते अंबादास बनकर यांचे समर्थक किसनराव धनगे यांची सभापतीपदी तर युवा नेते संभाजीराजे पवार यांचे समर्थक अ‍ॅड. बापूसाहेब गायकवाड उपसभापतीपदी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

गेले दहा वर्षे विरोधात राहिल्यानंतर अचानक एकत्र आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्याकडून शिवसेनेचे युवानेते संभाजी पवार यांच्या वहिनी सविता पवार यांना सभापतीपद दिले जाईल अशी सर्व स्तरातून दावे होत होते. मात्र सर्व दावे फोल ठरवत भुजबळांनी सभापतीपदाची पहिली टर्म राष्ट्रवादीकडेच ठेवली आहे. पुढच्या टर्मला शिवसेनेचा सभापती होऊ शकतो.

Yeola Bazar Samiti News:
Yeola Bazar Samiti : छगन भुजबळांची विधानसभेची रंगीत तालमी यशस्वी!

नाशिक जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये छगन भुजबळ यांच्यासह अंबादास बनकर, संभाजी पवार यांनी एकत्र येऊन शेतकरी विकास पॅनलची स्थापन केले होते. (Bazar Samiti Election)

शेतकरी विकास पॅनलच्या विरोधात भाजपचे नेते बाबा डमाळे आणि ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, आ. दराडे बंधूंनी शेतकरी समर्थक पॅनलची उभारले होते. निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली तसतशी या निवडणुकीतील चुरसरही वाढली होती. मात्र निवडणूकीत निवडणुकीच्या (APMC election) निमित्ताने छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी येवला मतदारसंघातील डोईजड विरोधकांना घरी बसवले.

Yeola Bazar Samiti News:
Neera Bazar Samiti : अजितदादांकडून निष्ठावंतास न्याय : नीरा बाजार समिती सभापतीपदी जगताप बिनविरोध; उपसभापतीवरून घोळ

निवडणूक जिंकल्यानंतर बाजार समितीवर सभापती कोण होणार, यावरुन अनेक चर्चांना उधाण आले होते.तालुक्यात सविता पवार व संजय बनकर यांच्या नावांचीही चांगलीच चर्चा रंगली होती. तर उपसभापती पदासाठीही अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. पण आज भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या बैठकीत भुजबळ यांचे समर्थक किसनराव धनगे आणि संभाजी पवार यांचे समर्थक बापू गायकवाड यांचा एकमेव अर्ज आला. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचा विचार करून हा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Nashik news)

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com