हनुमान जन्मस्थळाचा वाद, पण साधू महंतच आपापसात भिडले

Nashik| Hanuman birthplace controversy| नाशिकच्या अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळाबाबत तोडगा काढण्यासाठी शास्रार्थ सभा भरली होती.
हनुमान जन्मस्थळाचा वाद, पण साधू महंतच आपापसात भिडले
Hanuman birthplace controversy

नाशिकच्या अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळाबाबत तोडगा काढण्यासाठी शास्रार्थ सभा भरली होती. मात्र सुरवातीपासूनच सभेत गोंधळ पाहायला मिळाला. सभेच्या सुरवातीलाच गोविंदानंद महाराज आणि नाशिकच्या साधू महंतांमध्ये खुर्चीवर बसल्याने वाद सुरु झाला. सभेच्या ठिकाणीच साधू महाराजांकडून बसण्यावरून नाराजीनाट्य सुरु झाल्याने मुळ मुद्दा बाजूलाच राहून फक्त बसण्यामुळे वाद सुरु झाला. काही वेळानंतर हा काळ गोंधळ कमी झाला.

तासभराच्या गोंधळानंतर सभेला पुन्हा सुरवात झाली खरी पण सभा जास्त वेळी चालू शकली नाही. किष्किंदाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी हनुमानाच्या जन्मस्थळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. सभा सुरु असतानाच गोविंदगिरी यांचे गुरू शंकराचार्य यांना सुधीरदास पुजारींनी काँग्रेसी म्हटल्याने पुन्हा वाद चिघळला. गोविंदगिरी यांनी माफी मागण्याची जोरदार मागणी केली. माफी मागा, माफी मागा असा आग्रहच त्यांनी केली. मात्र बोलता बोलता आवाज चढला आणि सुधीरदास यांनी गोंविदानंद यांच्यावर माईक उगारला. यामुळे गोविंदगिरी भडकले आणि उभे राहून माफी मागण्यासाठी आग्रह आग्रह धरु लागले या गोंधळामुळे हनुमानाच्या जन्मस्थळावर कोणताही निष्कर्ष न काढता सर्व साधू महंत तिथून निघून गेले. या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो.

गोविंदानंद सरस्वती महाराज यांच्या अंजनेरी हनुमान जन्मस्थळ नसल्याचा दाव्यानंतर हा वाद पेटला. गोविदानंद महाराजांनी याबाबत नाशिकच्या साधू महंतांना जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी खुले आव्हानही दिले त्यासाठी अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळावरुन वाद चांगलाच पेटला होता. हा वाद सोडविण्यासाठी आज भरलेल्या शास्रार्थ सभा भरवण्यात आली होती. मात्र सभा सुरु होण्यापूर्वीच बसण्यावरून साधू महंतांमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले. त्यामुळे कोण कुठे बसणार या वादात हनुमान जन्मस्थळाचा वाद बाजूलाच राहिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in