
Adway Hiray Criticised BJP : देशात गेल्या नऊ वर्षांत केंद्र सरकारने खूपच पापे केली आहेत. त्यांचे देशप्रेम, बंधुभाव हा दिखावू आहे, त्यांच्या डोक्यात केवळ मनुवाद, जातीयवादच आहे, अशी टीका शिवसेनेचे उपनेते डॉ. अद्वयआबा हिरे-पाटील यांनी केली आहे. (BJP`s brotherhood and helping nature is only showy)
शिवसेनेच्या (Shivsena) 'होऊ द्या चर्चा' या कार्यक्रमात ते मालेगाव (Malegaon) येथे बोलत होते. या वेळी त्यांनी राज्यातील व केंद्रातील भाजप (BJP) सरकारच्या दिखाऊपणाचा पर्दाफाश केला.
ते म्हणाले, भाजपने फक्त मतांच्या गठ्ठ्यांसाठी आदिवासी महिलेस राष्ट्रपती केले, पण त्यांचा जो हक्क किंवा मान-सन्मान आहे तो त्यांना देण्यात येत नाही, असा घाणाघात यांचाही समाचार घेतला.
शिवसेनेच्या वतीने होऊ द्या चर्चा- विचारा प्रश्न हा कार्यक्रम झाला. या वेळी ते बोलत होते. या वेळी संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांसह पक्षाचे पदाधिकारी होते. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
आपल्या आक्रमक शैलीत डॉ. हिरे म्हणाले, की भाजप आणि त्यांच्या आघाडी विरोधात सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी स्थापन केली. त्याचा धसका केंद्र सरकारने घेतला आहे. ते सगळीकडचे इंडिया नाव पुसण्यामागे लागले आहेत. केंद्र सरकारने इंडिया नावाचा कितीही द्वेष केला, तरी येत्या निवडणुकीत इंडिया आघाडीचीच सत्ता येणार आहे.
ते पुढे म्हणाले, की ‘वन नेशन वन इलेक्शन'चा घाट घालून ते डिसेंबरपर्यंत निवडणुका जाहीर करतील. त्यामुळे आपणही शिवसेनेच्या आदेशान्वये आपले काम करून केंद्र सरकार व राज्य सरकार बदलायचे आहे. आजपासूनच आपल्याला निवडणुकीच्या तयारीला लागायचे आहे. देश व राज्य पातळीवर झालेल्या सर्व्हेमध्ये आपले सरकार येणार असल्याचे स्पष्ट संकेत प्राप्त झाले आहेत.
या वेळी प्रमोद शुक्ला, रामभाऊ मिस्तरी, प्रसाद (लकीदादा) खैरनार, पवनदादा ठाकरे, काशिनाथ पवार, राजाराम जाधव, सुजित सूर्यवंशी, जवानसिंग मोरकर, संजय निकम, नथूबाबा जगताप, अमितभाई लकडेवाले, प्रेम माळी, सनि जगताप, दशरथ निकम यांसह विविध नेते उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.