Jamkhed Bazar Samiti: राम शिंदे-रोहित पवारांमध्ये पुन्हा काँटे की टक्कर; कर्जतप्रमाणेच जामखेडलाही मिळाल्या समसमान जागा..

Jamkhed Market Committee Election : राम शिंदे-रोहित पवारांमध्ये पुन्हा काटे की टक्कर...
Jamkhed Market Committee Election
Jamkhed Market Committee Election Sarkarnama

Ahmednagar News : राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. त्यानंतर अनेक बाजार समित्यांचे निकालही आजच समोर आले आहेत. यातच नगर जिल्ह्यातील जामखेड बाजार समितीतीचा निकाल समोर येत आहे.

जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीचा 18 जागांचा निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या गटाला ९ जागा तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या गटाचा ९ जागांवर विजय झाला आहे.

Jamkhed Market Committee Election
Atpadi Bazar Samiti Result : आटपाडीत फिफ्टी-फिफ्टी; सत्ता कुणाची येणार ?

कर्जतप्रमाणेच जामखेड बाजार समिती निवडणुकीतही चुरशीची झाली. दरम्यान, जामखेड बाजार समितीच्या सभापतीच्या निवडीतही कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jamkhed Market Committee Election
Sangola Bazar Samiti Results : सांगोल्यात देशमुखांच्या सहमतीच्या राजकारणाला पसंती; बाजार समितीवर सर्वपक्षीय पॅनल !

दरम्यान, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या गटामध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली.

कर्जत बाजार समितीत दोन्ही गटाला 9-9 जागा मिळाल्या. त्यानंतर आता जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीतही अत्यंत चुरस पाहायला मिळाली. कर्जतप्रमाणे पुन्हा 9-9 अशा जागांवर दोन्ही गटाचा विजय झाला.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com