शिंदे गटाला मिळेना यश; नेते हतबल : दुसऱ्या फळीत लॉबिंग करूनही शिवसैनिक फुटेना

Eknath Shinde News : ठाकरे गटातील नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न
CM Eknath Shinde| Uddhav Thackeray|
CM Eknath Shinde| Uddhav Thackeray| sarkarnama

Eknath Shinde News : महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्याने स्थापन झालेल्या बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) सत्ता मिळवण्यासाठी प्रभावी नेत्यांची फौज नाशिकमध्ये (Nashik) मिळत नसल्याने पक्षाची सूत्रे हाती असलेल्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी होत आहे.

इतर राजकीय पक्षांऐवजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील पदाधिकारी व माजी नगरसेवक फोडण्यात किंवा पक्षात आणण्यासाठी अधिक रस घेतला जात आहे. मात्र, निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार हवे तसे यश पदरात पडत नसल्याचे दिसून येत असल्याने नेत्यांवर दबाव वाढत आहे.

CM Eknath Shinde| Uddhav Thackeray|
Uday Samant News : राजन साळवींबाबत उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

नाशिक हा शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला होऊ पहात आहे. त्यामुळे शिंदे गटाने येथे विशेष लक्ष केंद्रीत केले. मात्र, पालकमंत्री, खासदार अन् एक आमदार असुनही त्यांना शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना आकर्षित करता आलेले नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील नेत्यांना फोडून त्यांच्यासमोर आव्हान उभे करण्यात हे नेते अपयशी ठरत असल्याची चर्चा आहे.

जून महिन्यात राज्यात महाविकास आघाडीतील शिवसेना या प्रमुख घटक पक्षात फूट पडून तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली चाळीस आमदारांचा गट बाहेर पडला. भाजपच्या पाठिंब्याने राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले, तर भाजपकडे प्रमुख मंत्रिपदे गेले. शिंदे गटाने आपणच खरे शिवसेना असल्याचा दावा करताना न्यायालयातदेखील याचिका दाखल केली.

एकीकडे ठाकरे गटाशी दोन हात करत असताना त्याच त्यांच्याच गटाला खिंडार पाडण्यासाठी प्रयत्न होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीस आमदार बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचा मोठा गट त्यांच्यामागे जाईल, असा अंदाज होता. मात्र, एकनाथ शिंदे गट बळकट करण्यासाठी राज्यात अपेक्षित यश मिळाले नाही. अशीच स्थिती नाशिकमध्ये आहे.

नाशिक जिल्ह्यात मालेगाव, नांदगाव, सिन्नर व नाशिक तालुक्यासह महापालिका क्षेत्रात शिंदे गटाला ताकद वाढवायची आहे. विशेष करून नाशिक महापालिका केंद्रस्थानी मानून नियोजन केले जात आहे. परंतु, अपेक्षित यश मिळत नसल्याची नाराजी वरिष्ठ पातळीवर व्यक्त करण्यात आल्याचे समजते.

CM Eknath Shinde| Uddhav Thackeray|
बावनकुळे म्हणाले, राहुल गांधी महाराष्ट्रात असताना त्यांचे ५०० लोक आमच्याकडे आले...

महापालिका केंद्रस्थानी मानून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात विचारणा होत असली तरी अपेक्षित यश मिळत नसल्याचे शल्य व्यक्त केले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com