Nashik News : नाशिकमध्ये ठाकरेंच्या गडाला हादरा; माजी आमदारासह ५० नेते शिंदे गटात प्रवेश करणार

Nashik News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेला (Shivsena) एका मागे एक धक्के बसत आहेत.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama

Nashik News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेला (Shivsena) एका मागे एक धक्के बसत आहेत. नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. जिल्ह्यातील ठाकरे गटाचे माजी आमदार, माजी जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि अन्य पदाधिकारी आज (ता. २७) शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जवळपास ५० पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. रात्री नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी हा प्रवेश पार पडेल, अशी माहिती आहे. त्यासाठी प्रवेश करणारे सर्व पदाधिकारी नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Winter Session News: अधिवेशन सोडून माणिकराव कोकाटे नाशिकला परतले, कारण...

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते भाऊसाहेब चौधरी यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, नाशिक शिवसेना विकासाच्या समृध्दीने नागपूर कडे रवाना... नाशिक जिल्ह्यातील शिवसेना माजी आमदार, मा. नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य, सरपंच ग्रामपंचायत सदस्य सह ५० पेक्षा जास्त पदाधिकारी नागपूर कडे रवाना. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नाशिकमध्ये दोन आमदार, एक खासदार आणि एक नगरसेवक यांशिवाय शिंदे गटाला काही हाती लागले नव्हते. नाशिकचे सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक आजी-माजी नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे होते. मात्र, ही मशाल सोडून ठाकरे गटातील सैनिकांनी ढाल तलवार हाती घेतल्याचे चित्र आता निर्माण झाले आहे.

एकनाथ शिंदे गटाने नाशिकच्या ठाकरे गटाचा गड हादरवला आहे. नाशिकमधील माजी नगरसेवकांचा मोठा गट शिंदे गटात गेला. त्यानंतर आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थित मनमाडमध्ये माजी नगराध्यक्ष अस्मा तांबोळी, सादिक तांबोळी यांच्यासह समर्थकांचा १६ डिसेंबरला प्रवेश झाला होता. त्यामुळे ठाकरे गटाला आणखी एक शॉक बसला.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
राजेंद्र राऊतांच्या कार्यकर्त्याने तलवारीने हल्ला करूनही गुन्हा दाखल नाही : सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

दरम्यान, पुन्हा एक धक्का ठाकरे गटाला नाशिकमधून मिळत आहे. त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गट खिळखिळा तर होणार नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिकच्या दिंडोरी विधानसभेचे माजी आमदार धनराज महाले शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. धनराज महाले सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटात आहेत. महाले २००९ ते २०१४ या कालावधीत दिंडोरीचे आमदार होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in