Nandgaon Bajar Samiti Results : आमदार सुहास कांदेंनी १५ जागा जिंकल्या, आघाडीचा धुव्वा

Suhas Kande News : नांदगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज रविवारी (ता. ३०) मतदान झाले. मतदानानंतर लगेच मतमोजणी सुरू झाली.
Chhagan Bhujbal-Suhas Kande
Chhagan Bhujbal-Suhas KandeSarkarnama

Nandgaon Bajar Samiti : नांदगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज रविवारी (ता. ३०) मतदान झाले. मतदानानंतर लगेच मतमोजणी सुरू झाली. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ आणि शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या पॅनलमध्ये लढत होती. सुरवातीच्या निकालात कांदे पॅनलचे १५ जागांवर आघाडी घेतली. एक अपक्ष आणि महाविकास आघाडीला केवळ दोन जागा मिळाल्या. (MLA Suhas kande wins in Nandgao APMC election)

आज मनमाड बाजार समितीचे मतदान झाल्यावर सायंकाळी पाच वाजता पंचवीस मतपत्रिकांचा एक याप्रमाणे गठ्ठे तयार करुन मतमोजणी सुरु झाली. नांदगाव बाजार समितीच्या निवडणुकीत १ हजार ६४१ मतदारांचे मतदान झालेले. सोसायटी गटात अनेक मतपत्रिका बाद झाल्या आहेत.

Chhagan Bhujbal-Suhas Kande
Kolhapur Bajar Samiti Results : निष्ठावंतांची चेष्ठा अन् गद्दारांची प्रतिष्ठा; भाजप हद्दपार...बाजार समितीच्या मतपेटीत...

हमाल मापारी गटात अपक्ष निलेश इप्पर सुरवातीपासून आघाडीवर आहेत. या गटातून गेली वीस वर्षे संचालक असलेले भास्कर कासार यांना धक्का बसला आहे. अपक्ष निलेश इप्पर यांना ६८, भास्कर कासार यांना ३८ तर ५ मे बाद झाली. त्यात अपक्ष इप्पर विजयी झाले. येथे आमदार कांदे गटाचा उमेदवार परपाभूत झाला आहे.

विरोधकांनी या गटात उमेदवार दिलेला नव्हता. हमाल व मापारी गटात आमदार कांदे गटाचे गोकुळ कोठारी, नावंदर, नितेश इप्पर आणि अनिल सोनवणे, दिपक मोरे, बंडू पाटील, अनिल वाघ विजयाच्या मार्गावर आहेत.

Chhagan Bhujbal-Suhas Kande
Pandharpur politics : अभिजीत पाटलांचं ठरलं : मेच्या दुसऱ्या आठवड्यात पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

आता पर्यंत सात जागांचा निकाल जाहिर झाला आहे. त्यामध्ये सुहास कांदे गटाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. व्यापारी गटात विरोधी गटाने एकाच जागेवर दिलेला उमेदवार पराभूत तर समसमान मते मिळालेले व्यापारी गटातील नावंदर व कोठारी यांचा फैसला चिठ्ठीवर होणार आहे. कोठारी यांनी प्रचारात आमदार कांदे यांचे छायाचित्र लावून केला होता. त्यामुळे ती जागाही आमदार गटाची समजण्यात येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com