भडकावू भाषणाला भिक घालू नका!

मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा
Chhagan Bhujbal In Id ceremoney
Chhagan Bhujbal In Id ceremoneySarkarnama

येवला : राज्यात (Maharashtra) त्यांनी तेढ निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी या देशाचे संविधान (Constitution) आपले रक्षण करेल. त्यामुळे अशा भडकावू भाषणाकडे दुर्लक्ष करून शांतता ठेवत राज्याची प्रगतीचे साक्षीदार व्हा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे.

Chhagan Bhujbal In Id ceremoney
भुजबळांच्या येवल्यात राष्ट्रवादी-शिवसेनेत सलोख्याचे पर्व!

ईद-उल-फित्र तथा रमजान ईदनिमित्ताने एकोप्याने, उत्साहाने ईद साजरी करा व महाराष्ट्रातून देशाला समतेचा संदेश द्यावा, असे आवाहन करत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील सर्व मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. येवला येथील ईदगाह मैदानावर आयोजित नमाजपाठणावेळी मंत्री भुजबळ यांनी उपस्थिती लावली.

Chhagan Bhujbal In Id ceremoney
नाशिकमध्ये ३९ मशिदींना अजानची परवानगी नाकारली!

या वेळी ते म्हणाले, की देशात आपल्याला शांतता राखायची असेल आणि समतेच्या मार्गाने जायचे असेल तर सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे. आपल्या मुलांना आणि मुलींना समान शिक्षण दिले पाहिजे. शिक्षण हा आपला अधिकार आहे. हे सांगतानाच त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत कार्य करणाऱ्या फातिमाबी शेख यांची देखील आठवण काढली.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे कायम शिक्षण, विकासासाठी आपल्या सोबत आहेत. काही मंडळी दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे भडकावू भाषण करत आहेत. मात्र त्याला बळी न पडता आपण विकासाच्या, रोजगाराच्या, आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या मुद्द्यांवर ठाम राहायला हवे. त्यांनी तेढ निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी या देशाचे संविधान आपले रक्षण करेल, असे ठाम मतदेखील भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. मधला काळ हा कोरोनाचा होता, अडचणींचा होता आता मात्र परिस्थिती सुधारते आहे. सर्वांना उत्तम आरोग्य घेऊन समाजात एकता, समता, बंधुत्वाची भावना वाढीस लागो, अशीच प्रार्थना करू या, असेही ते म्हणाले.

या वेळी आमदार नरेंद्र दराडे, ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, शहरकाजी सलीमुद्दीन मिसबाही, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष अकबर शहा, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, भोलानाथ लोणारी, निसारभाई लिंबूवाले, मुशरीफ शहा, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दीपक लोणारी, भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे, गोटू मांजरे आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com