अवैध सावकाराचे पाळेमुळे खोदणाऱ्या धुळे पोलिसांची पाठ थोपटली!

आयजी डॉ. बी. जी. शेखर यांच्याकडून धुळे पोलिस दलाचे कौतुक करण्यात आले.
File Photo of Bank locker
File Photo of Bank lockerSarkarnama

धुळे : अवैध सावकारी (Lending) विरोधात धुळे (Dhule) जिल्हा पोलिस दलाची कामगिरी कौतुकास्पद असल्याचे म्हणत अवैध सावकारी संपुष्टात आणण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन नाशिक (Nashik) परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील (Dr. B. G. Shekhar) यांनी येथे केले. (Dhule city illigal lending case took a sevier turn)

File Photo of Bank locker
आयुक्त रमेश पवारांच्या नजरेने काढला गणवेष भ्रष्टाचाराचा एक्सरे!

डॉ. शेखर पाटील शुक्रवारी धुळ्यात होते. या दौऱ्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले, की शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध सावकारी वाढल्याच्या तक्रारी पोलिस दलास प्राप्त झाल्या. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी मोहीम उघडली, कारवाई सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसात शहरात झालेली कारवाई हा त्याचाच एक भाग आहे. अवैध सावकारी प्रकरणातील संशयित राजेंद्र बंब याला अटक केल्यानंतर पहिल्या दिवशी त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, खरेदी खत, सौदा पावती जप्त करण्यात आली. दुसऱ्या दिवशीही पोलिसांनी त्याच्यासह पत्नीच्या एका बँक लॉकरमधून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर अवैध सावकारीबाबत अनेक तक्रारी येत आहेत.

File Photo of Bank locker
भाजप नगरसेवक म्हणाले, `कार्यवाही होणार असेल तर भुंकतो`

सावकार राजेंद्र बंबसह इतर अवैध सावकारीबाबत आणखी तक्रारी असतील तर जनतेने पुढे यावे. गरिबांना छळणाऱ्या अशा प्रवृत्तींना धडा शिकविण्यासाठी जनतेने पुढे येण्याची गरज डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी बोलून दाखविली. पोलिसांनी केलेल्या या कारवायांमुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्‍वास निर्माण होण्यासही मदत होत असल्याचे ते म्हणाले.

गुन्हेगारांवर वचक

अवैध शस्त्रप्रकरणी ऑक्टोबर २०२१ पासून जिल्हा पोलिस दलाने कारवाया केल्या आहेत. यात १९ आरोपींना अटक केली आहे. तलवारीबाबतचे आठ गुन्हे दाखल आहेत. नाशिक परिक्षेत्रात १४५ अवैध पिस्तूल, २०४ जिवंत काडतुसे, २९८ तलवारी जप्त केल्या आहेत. एकूण १५६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तसेच विविध गुन्ह्यांतील १६ फरारी आरोपी, ४८९ वॉन्टेड आरोपी जेरबंद केले आहेत. २२० तडीपारांवर कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढे आल्यानंतर गुन्हेगारांवर वचक बसविण्यात यामुळे यश आल्याचे डॉ. शेखर पाटील म्हणाले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com