Eknath Khadse: पन्नास खोके घेतले, मग मंत्रिपद कशाला?

एकनाथ खडसे यांनी लॉबिंग करणाऱ्या आमदाराला मुख्यमंत्र्यांनी सुनावले? अशी माहिती दिली.
Eknath Khadse & Eknath Shinde
Eknath Khadse & Eknath ShindeSarkarnama

भडगाव : ‘पन्नास खोके घेतले, मग तुम्हांला मंत्रिपद कशाला’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जळगावातील (Jalgaon) मंत्रिपदासाठी लॉबिंग करणाऱ्या आमदारांना (MLA) विचारतात असा गौप्यस्फोट माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. ते आज भडगाव तालुक्यात कनाशी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. (NCP leader Eknath Khadse criticise Shinde group MLAs for Ministry)

Eknath Khadse & Eknath Shinde
NCP : पडळकर, भाजपच्या डबक्यात बसून डराव- डराव करणं बंद करा ; विद्या चव्हाणांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आजपासून पाचोरा-भडगाव मतदारसंघात जनसंवाद यात्रा सुरू करण्यात आली. महानुभाव पंथाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कनाशी गावापासून जनसंवाद यात्रेचा शुभारंभ झाला.

Eknath Khadse & Eknath Shinde
तर तीन वर्षांच्या नातीसह संपूर्ण कुटूंब आत्महत्या करु ; एम.के. मढवींचा मुख्यमंत्र्यांना इशारा

श्री. खडसे पुढे म्हणाले,‘ मंत्रिपदासाठी जिल्ह्यात रस्सीखेच सुरू आहे. आमदारांनी गाडयाभरून मुंबईत लॉबिंग केले. अपक्ष आमदारांसह अनेक जण मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे तुम्ही पन्नास खोके घेतले ना, मग तुम्हांला मंत्रिपद कशाला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'त्या' आमदारांना विचारतात. जे गुलाबराव आपल्या भाषणातून गद्दारी माझ्या रक्तात नाही, असे सांगायचे तेच गुलाबराव पाटील आता उद्धव ठाकरेंना अक्कल शिकवायला लागले आहेत असा टोला त्यांनी लगावला. चौफेर टोलेबाजी करत शिंदे गटावर त्यांनी चांगलीच तोफ डागली.

यावेळी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, अमळनेरचे आमदार अनिल पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, प्रदेश प्रवक्ते योगेश डिसले, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, पीटीसीचे चेअरमन संजय वाघ, विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन तावडे मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रत्येक गावात साधणार संवाद

जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून माजी आमदार दिलीप वाघ व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी दोन्ही तालुके पिंजून काढणार आहेत. प्रत्येक गावात जाऊन ते ग्रामस्थांनी संवाद साधणार आहेत. काही मोठ्या गावात सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com