आदेश येईल तेव्हा बंड करणाऱ्यांना टोले हाणू!

धुळे शहरात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी भक्तीयात्रा काढण्यात आली.
Shivsena party workers at Dhule Office
Shivsena party workers at Dhule OfficeSarkarnama

धुळे : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरोधात (Shivsena) बंड केले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांचे सरकार अल्पमतात आले. यासंदर्भात शहर सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्रि म्हणाले, `शिवसेना हा आदेशावर चालणारा पक्ष आहे. आदेश येईल त्या दिवशी शिवसैनिक टोले हाणायलाही कमी करणार नाही`(Shivsena leaders Mahesh mistry aggressive on Eknath Shinde`s Rebel)

Shivsena party workers at Dhule Office
शिंदे गटाला पहिला झटका; बंडखोर आमदार योगेश कदम माघारी फिरण्याच्या वाटेवर

काल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात भक्तीयात्रा काढून बंडखोरांचा निषेध केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठींबा व्यक्त केला. याबाबतश्री. मिस्त्री यांनी आदेश नसताना भक्तीयात्रा काढण्यात आल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेच्या समर्थनार्थ ते रस्त्यावर उतरले असले तरी धुळ्यात शिवसेनेत दुफळी नाही, असेही श्री. मिस्त्री यांनी सांगितले.

Shivsena party workers at Dhule Office
शिंदेंसाठी मी काय कमी केलं, ठाकरे, शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा : मुख्यमंत्री ठाकरे

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आदेशाची वाट पाहत आहोत. जिल्हा कार्यालयात ऑनलाइन संवाद कार्यक्रमास उपस्थित राहिलो, असे सांगितले.

यावेळी महानगरप्रमुख मनोज मोरे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, नरेंद्र परदेशी, भरत मोरे, संजय वाल्हे, कैलास मराठे, कैलास पाटील, नान वाघ, नितीन पाटील, ललित माळी, संजय जवराज, छोटू माळी, प्रवीण साळवे, जगदीश मासुळे, विनोद जगताप, बापू मराठे, योगेश थोरात, मनोज बंब, गुलाब धोबी, बापू नेरकर, रोहीत धाकड आदी उपस्थित होते.

ठाकरे यांना त्रास देत आहेत

पक्षीय विचारधारेमुळे कोणताही राजकीय वारसा नसलेले सामान्य कार्यकर्ते शिवसेनेशी जोडले गेले. त्यातील अनेक नगरसेवक, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष व विविध पदांवर निवडून आलेत. हिंदुत्वाचा विचार ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला दिलेली देणगी आहे. हिंदुत्वाचे नाव पुढे करत मुख्यमंत्री ठाकरे यांना बंडखोरांकडून त्रास दिला जात आहे. ते शिवसैनिक कदापी सहन करणार नाही. बंडखोरांना कुणीही भीक घालणार नाही, असे श्री. माळी म्हणाले.

यावेळी काढलेल्या भक्तीयात्रेत श्री. माळी, जिल्हा संघटक मंगेश पवार, पंकज गोरे, राजेश पटवारी, सचिन बडगुजर, संदीप चव्हाण, नगरसेविका ज्योत्स्ना पाटील, प्रफुल्ल पाटील, संदीप सूर्यवंशी, राज माळी, भटू गवळी, दिनेश पाटील यांसह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com