आमदारांनी दहा कोटी आणावे, दोन दिवसात पाणी देऊ!

महापालिका आयुक्त देविदास टेकाळे यांचा पारा चढल्याने सदस्यांची झाली पंचाईत
Devidas Tekale
Devidas TekaleSarkarnama

धुळे : महापालिकेच्या (Dhule) सदस्यांनी आयुक्तांना (Commissioner) उद्देशून प्रश्‍न विचारल्यावर महापालिका स्थायी समितीच्या सभेत आयुक्त देविदास टेकाळे (Devidas Tekale) यांचा पारा चढला. छोटे अतिक्रमण (encroachment) काढतानाही तुम्ही विरोध करता. मग शहराच्या समस्यांचे निराकरण होणार कसा? असे म्हणत त्यांनी नगरसेवकांवरही निशाणा साधला. (Commissioner order action against encroachment in City)

Devidas Tekale
आमदार चव्हाण यांच्या फेसबुकवर काळा बुरखाधारी सुरा घेतलेली व्यक्ती कोण?

स्थायी समितीची गुरुवारी सभा झाली. सभापती शीतल नवले, आयुक्त देविदास टेकाळे, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते.

यावेळी काही सदस्यांनी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांसाठी टाकीवर चढून आंदोलन करण्याची हौस नाही. आम्हाला पाणी केव्हा देणार? असा प्रश्न केला. त्यावर सभापतींनी आमदारांना शासनाकडून दहा, बारा कोटी रुपये आणायला सांगा. दोन दिवसांत पाणी देऊ असे सुनावले.

Devidas Tekale
Eknath Shinde: महाविकास आघाडीच्या नियोजन समिती सदस्यांना घरचा रस्ता!

शहरातील पूरस्थितीबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांवर ठपका ठेवत नोटीस बजावली. त्यावर मनपाच्या स्थायी समिती सभेत पडसाद उमटले. याबाबत काही सदस्यांनी त्याबाबत विचारणा केली. त्यावर आयुक्त संतापले. आयुक्त म्हणाले, नोटीस म्हणजे केवळ आयुक्तच जबाबदार नव्हे, तर आपल्या सर्वांची ती जबाबदारी असते असा युक्तिवाद करत गटारी, नाल्यावरील अतिक्रमणांबाबत गय करणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

भेटीचा फायदा काय?

सदस्य हर्षकुमार रेलन यांनी दोन- तीन वर्षांपासून वसाहतींमध्ये पाणी शिरते, त्यामुळे नागरिकांचे नुकसान होते, आरोग्याचा प्रश्‍न उभा राहतो, मग आपले नियोजन कुठे जाते असा प्रश्‍न केला. नॅशनल हायवे, सार्वजनिक बांधकाम, बीएसएनएल आदींच्या कामांमुळे गटारींच्या काही समस्या निर्माण झाल्या. त्याबद्दल संबंधित विभागांवर आपण काय कारवाई केली. अधिकारी घटनास्थळी भेटी देतात, त्याचा काय फायदा झाला? पथदिव्यांचे प्रश्‍नही श्री. रेलन यांनी मांडले.

अन् आयुक्तांचा संताप

सदस्या प्रतिभा चौधरी यांनी पूरस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांना बजावलेल्या नोटीस प्रकरणी ‘सकाळ'चे अभिनंदन करत पावसाळ्यापूर्वी तयारी का केली नाही, असा प्रश्‍न केला. प्रभागातील प्रोफेसर कॉलनीत कमरेपर्यंत पाणी शिरले. गेल्या चाळीस वर्षांत असे कधी घडले नव्हते असे सांगत सौ. चौधरी यांच्या सरबत्तीनंतर आयुक्त टेकाळे हेही संतापल्याचे दिसले. अतिक्रमणप्रश्‍नी कारवाईला आमचा विरोध नसल्याचेही सौ. चौधरी यांनी स्पष्ट केले.

आमदारांनी १० कोटी आणावे

पाणीपुरवठ्याप्रश्‍नी जलकुंभावर आंदोलनाची आम्हाला हौस नाही असे म्हणत सदस्य नाजियाबानो पठाण यांनी नवा जलकुंभ सुरु करण्याची मागणी केली. त्यावर सभापतींनी कार्यवाहीची सूचना दिली. शहराच्या आमदारांना शासनाकडून १० ते १२ कोटी रुपये आणून देण्यास सांगा. आम्ही दोन दिवसात पाणी देऊ, असे सभापती नवले यांनी सुनावले. आमदारांनी मनपा अधिकाऱ्यांना अपशब्द वापरणे चुकीचे आहे असे म्हणत त्याचा सभापती नवले, सदस्य बोरसे यांनी निषेध केला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com