Shirdi Bus accident; चालकाने प्रवाश्यांचे ऐकले असते तर दहा जीव वाचले असते!

एकाच वेळी गावातील 10 जणांचा मृत्यू, मोरीवली गावच्या इतिहासातील सर्वात भीषण घटना
Bus-Truck accident at Sinner
Bus-Truck accident at SinnerSarkarnama

नाशिक : (Nashik) चालक जास्त वेगाने व बेदरकारपणे बस चालवत होता. त्यामुळे प्रवासी (Passengers) अनेक वेळा पुढच्या सीटवर आदळले. प्रवाश्यांनी चालकास हळू चालवा असे विनवले होते. मात्र त्याने वेग कमी केला नाही. प्रवाश्यांचे ऐकले असते तर दहा जणांचे प्राण वाचले असते, असे शिर्डीच्या (Shirdi) अपघातग्रस्त बसमधील जखमी प्रवाश्यांनी सांगितले. (Private Bus found serious accident on Siiner-Shirdi highway)

Bus-Truck accident at Sinner
Congress news; डॉ. सुधीर तांबे यांनी तीन महिने काय केले?

मोरीवली गावातील नागरिकांनी शिर्डीला दर्शनासाठी जाण्याचे निश्चित केले होते. त्यासाठी त्यांनी पंधरा बसेस भाड्याने केल्या होत्या. त्यातील एका बसला भीषण अपघात झाला. त्यात दहा जणांचे प्राण गेले. ही गावाच्या इतिहासातील सर्वात भीषण घटना असल्याने गावावर शोककळा पसरली.

Bus-Truck accident at Sinner
Satyajeet Tambe News; तांबेचा डाव हा तर प्री प्लॅन मिशन लोटस!

यासंदर्भात जखमींवर नाशिकला उपचार सुरु आहेत. यातील प्रवाश्यांनी सांगितले की, चालकास दोनदा विनंती केली होती. तो खुप वेगाने व अनियंत्रीत पद्धतीने बस चालवत होता. `तुम्ही गाडी हळू चालवा, प्रवाश्यांना त्रास होतो आहे. मात्र त्याने आमच्या सुचनेकडे साफ दुर्लक्ष केले.

प्रवासी म्हणाले, बसचा चालक भरधाव वेगात गाडी चालवत होता. हळू चालव म्हणून आम्ही दोन वेळा त्याला सांगितले होते. बस अचानक ब्रेक लावत असल्याने प्रवासी पुढच्या सीटवर आदळत होते. चालक एव्हढ्या जोरात ब्रेक मारायचा, की सगळ्यांना त्याचा त्रास व्हायचा. यावेळी पहाटेची वेळ असल्याने बहुतांश प्रवासी त्रस्त होते. बहुतांश प्रवासी झोपेत असताना मोठा आवाज झाला, खिडकीची काच फोडून बाहेर उडी मारली.

मुंबईहून शिर्डीकडे जाणाऱ्या बसला पाथरे (सिन्नर) येथे अपघात झाला. त्यात खाजगी बस आणि शिर्डीकडून सिन्नर कडे जाणारा ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. टोलनाका ओलांडल्यावर एकेरी वाहतूक होती. अंबरनाथ (ठाणे) परिसरातील सुमारे प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. उल्हासनगर येथील 15 बस भाविकांना घेऊन शिर्डीला निघाल्या होत्या. त्यातील एका बसला हा भीषण अपघात झाला. या अपघातात दहा जणांना आपला जीव गमवावा लागला.

काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत बसमधून उड्या मारून जीव वाचविल्याचे सांगितले. काहींनी खिडकीतून उड्या मारल्या. काही दरवाजातून कसेबसे निसटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बसमध्ये मागून दुसऱ्या सीटवर बसलेल्या प्रवाश्यांनी चालक भरधाव गाडी चालवत होता. अपघात झाला. तेव्हा बसमधील बहुतांश प्रावसी झोपेत होते.

मोरीवली गावावर शोककळा

मृत्युमुखी पडलेले बहुतांशी भाविक हे मोरीवलीचे (अंबरनाथ) ग्रामस्थ आहेत. अपघाताचं वृत्त समजताच ग्रामस्थ अपघातस्थळी रवाना झाले. गावाच्या इतिहासातील अशी गंभीर अपघाताची पहिलीच घटना आहे. एकाच वेळी गावातील 10 जणांचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे गावात शोकाकुल वातावरण पसरलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com