बंडखोर आमदारांचे शिवसेनेवरील प्रेम बेगडी!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिता भामरे यांनी बंडखोर आमदार, खासदार जनतेला फसवत असल्याचा आरोप केला.
Anita Bhamre
Anita BhamreSarkarnama

नाशिक : केवळ सत्तेसाठी शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thakrey) यांच्याशी बंडखोरी करणे हेच बंडखोर आमदार, खासदारांचे शिवसेनेवरील बेगडी प्रेम आहे, अशी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेस (NCP) नाशिक शहराध्यक्ष अनिता भामरे (Anita Bhamre) यांनी केली आहे. (NCP womens wing criticized Shivsena rebel MLA)

Anita Bhamre
रूपाली चाणकरांनी ठणकावले, ...तर सरपंचाचे पद रद्द करू!

शिवसेनेतील बंडखोर आमदार, खासदारांचे हिंदुत्वाच्या नावाने नविनच शक्कल लढविण्याचे कटकारस्थान सध्या दिसून येते. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडतांना कधी राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस बरोबर सत्तेत मांडीला मांडी लावून बसतांना लाज वाटत होती, कधी मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मिळत नव्हता म्हणून तर कधी हिंदुत्व आडवे येत होते अशी बदनामीची मोहिम बंडखोर आमदारांनी केली. मुळात या बंडखोरांचे शिवसेनेवरील प्रेमच बेगडी आहे हे लक्षात येते अशी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या भामरे यांनी केली.

Anita Bhamre
बंडखोर सुहास कांदेच्या मतदारसंघात पंकज भुजबळ झाले सक्रीय!

त्या म्हणाल्या, आजपर्यंत शिवसेनेत ठाकरे कुटुंबांतील कुठल्याही सदस्याने प्रत्यक्ष सत्तेत सहभाग घेतला नव्हता. यामुळे इतर नेत्यांना आपल्या मर्जीप्रमाणे पदे व सत्तेत संधी मिळत होती. २०१९ च्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची संधी चालून आली. आदित्य ठाकरेंही मंत्री झाले. यातूनच शिवसेनेत खऱ्या अर्थाने बंडखोरी जन्माला आली. ज्या बंडखोरांना उध्दव ठाकरे मुख्यमंत्री अथवा आदित्य ठाकरे यांचे मंत्री होणे सहन झाले नाही ते इतर कार्यकर्त्यांना काय न्याय देणार? तेव्हा अशा बंडखोराकडून अपेक्षा करणे धोक्याचे ठरेल.

भाजप सारख्या पक्षाला सत्तेत पराभूत करायचे असेल तर महाविकास आघाडी मधील तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूकीत लढावे लागेल. अशी तिन्ही पक्षातील नेत्यांची इच्छा होती. यामुळे शिवसेनेतील अनेक नेत्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मग अशावेळी आजपर्यंत युतीत असलेल्या भाजप सोबत गेल्यास आपले मतदार संघ तरी सुरक्षित राहतील या एकमेव उद्देशाने हिंदुत्वाचा नवीन मुद्दा बंडखोराकडून चर्चिला गेला.

नेमके हेच भाजपला अपेक्षित होते. कारण महाविकास आघाडी सरकार मध्ये शिवसेनेचा सहभाग भाजपला परवडणारा नाही. त्यामुळे साम, दाम, दंड, भेद या ना त्या कारणाने शिवसेनेत दुफळी घडविण्याचे पाप या बंडखोराकडून घडविले गेले. यासाठी आता राष्ट्रपती निवडणूकीत द्रौपदी मुरमू यांच्या हिंदुत्वाचा दाखला बंडखोर खासदारांकडून देण्यात येत आहे.

तसे पाहता पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते व आत्ताचे राष्ट्रपती पदाचे संयुक्त आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा हे देखील हिंदुच आहे हे बंडखोरांनी विसरता कामा नये. आता हीच वेळ आहे निष्ठावान कार्यकर्त्यांना जवळ करण्याची व बंडखोरांना बेदखल करण्याची. सत्ता येते जाते पक्षप्रमुख म्हणून ठाकरे यांना आता कठोर निर्णय घ्यावाच लागेल.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com