तक्रारी असतील तर थेट माझ्याकडे करा!

डॉ. भारती पवार यांनी नाफेडमार्फत होणारी कांदा खरेदी पारदर्शकपणे सुरु असल्याचा दावा केला.
Dr Bharti Pawar News, Nashik News in Marathi, Nashik Latest Marathi News
Dr Bharti Pawar News, Nashik News in Marathi, Nashik Latest Marathi NewsSarkarnama

नाशिक : काही देशातील युद्धजन्य परिस्थिती व श्रीलंकासारख्या (Shrilanka) देश अडचणीत असल्याने कांदा निर्यातीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना कांदा (Onion) वाहतुकीसाठी वॅगन मिळत नसतील तर थेट माझ्याकडे लेखी तक्रारी कराव्यात, असे केंद्रीय (Centre) आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी सांगितले. (If Farmers have any complain contact me directly)

Dr Bharti Pawar News, Nashik News in Marathi, Nashik Latest Marathi News
आमदार देवयानी फरांदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, भुजबळांची लाज काढली!

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. भारती पवार यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी गंगाधरन डी., जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील आदी उपस्थित होते. (Dr Bharti Pawar News)

Dr Bharti Pawar News, Nashik News in Marathi, Nashik Latest Marathi News
धक्कादायक; आमदारांनी नव्हे, कंत्राटदारांनी आणला १८ कोटींचा निधी?

नाफेडच्या माध्यमातून सर्वत्र कांदा खरेदी केली जात आहे. ही सर्व खरेदी त्यांना घालून दिलेल्या नियमांनुसार होत असून पहिल्या टप्प्यात कांदा खरेदीसाठी ऑनलाइन निविदा मागवण्यात आल्या होत्या. शेतकरी उत्पादक कंपनी महासंघ यांची निवड करून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कांदा खरेदी केला जात आहे. खरेदीदार घटक व कोणत्या शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी होतेय याची देखील माहिती मिळू लागल्याने नाफेडमार्फत होणारी कांदा खरेदी पारदर्शक असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला.

डॉ. पवार म्हणाल्या, की कांदा लागवडी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर उत्पादन वाढीसंबंधीचा अहवाल केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल व कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना सादर केला होता. त्यानुसार कांदा निर्यात बंद करण्यात आलेली नाही किंवा ती बंदही होणार नसल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी आश्‍वासन आम्हाला दिले आहे.

नाफेडच्या माध्यमातून कांद्याची लवकर कांदा खरेदी सुरू होण्यासाठी प्रयत्न केले आहेत .त्यामाध्यमातून चालू वर्षी सव्वा दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी होणार आहे. कांद्याचे उत्पादन जास्त असल्याने दरात घसरण आहे. राज्य सरकारनेदेखील आता कांद्याला अनुदान दिले पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना मदत होईल. तसेच नाफेडच्या कांदा खरेदीत अनागोंदी होत असल्याचा कांदा उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटनांचा आरोप आहे.

चालू वर्षापासून कांदा खरेदीचे कामकाज पारदर्शकपणे होत आहे. शेतकरी उत्पादक कंपनी महासंघाशी संलग्न असलेल्या कंपनीकडे स्वतःची साठवणूक क्षमता आहे ते तपासून त्यांना खरेदी देण्यात आलेली आहे. जर काही तक्रार असल्यास ती लेखी स्वरूपात कळवावी, त्याबाबत माहिती घेऊन चौकशी केली जाईल. यासह किसान रेलच्या माध्यमातून देखील शेतमालाची निर्यात केली जात आहे. उत्पादकांकडून वॅगन मिळत नसल्याच्या तक्रारी असल्यास शेतकऱ्यांनी थेट माझ्याकडे त्या कराव्यात त्यावर जाब विचारला जाईल.

सद्यःस्थितीत मागणीनुसार किसान रेल्वेसेवा सुरु आहे. यावेळी बियाणे, खते, वनपट्टे, कुसुम योजना, आरोग्य विभागाच्या कामकाजाचा देखील आढावा घेण्यात आला.

जिल्ह्यातील वाढते अपघात चिंतेची बाब

जिल्ह्यातून जात असलेल्या राष्ट्रीय व राज्य महामार्गावर गेल्या वर्षी १ हजार ३६३ अपघात झाले आहे. हे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याने यावर संबंधित यंत्रणेसोबत चर्चा करून ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. जिल्ह्यात अपघातांचे १३० ब्लॅक स्पॉट निश्‍चित झाले असून वाढते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी महामार्गावर सूचनाफलक, स्पीडगन आदी उपाययोजना राबविल्या जातील.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in