मी अमित ठाकरेंच्या मुलाच्या हाताखाली देखील काम करेन!

मनसेच्या औरंगाबाद येथील सभेत प्रकाश महाजन यांनी हा दावा केला.
Prakash Mahajan
Prakash MahajanSarkarnama

औरंगाबाद : ठाकरे (Thakre) नावात काय जादू असते ती मला कळली आहे. राज ठाकरे (Raj Thakre) हे तर हिंदू जननायक आहेत. मी अमित ठाकरे (Amit Thakre) यांच्या मुलांच्या हाताखाली देखील काम करायला तयार आहे, असे मनसेतील वरीष्ठ नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) म्हणाले.

Prakash Mahajan
नाशिकमध्ये गद्दारांमुळे मनसेची सत्ता गेली!

औरंगाबाद येथील विशाल सभेला मोठी गर्दी होती. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे सभास्थानी आगमन होण्याआधी विविध नेत्यांची भाषणे झाली. यावेळी प्रकाश महाजन बोलत होते. ते म्हणाले, मी हिंदीतून भाषणाला सुरवात करीत नसतो. मात्र आज मला म्हणायचे आहे की, सध्या देशाच्या राजकारणात वही होता हे जो मंजुरे राज ठाकरे चाहता है.

Prakash Mahajan
संजय राऊत मीडियाच्या भोंग्यातून बांग का देता?

ते म्हणाले, राज ठाकरे हे तर हिंदू जननायक आहेत. पोलिसांनी या सभेत विविध बंधने लादली आहेत, मात्र मी बोलणारच आहे, कारण मी राज साहेबांचा सैनिक आहे. राज ठाकरे यांनी १५ दिवसांपूर्वी मला कळवले की सभेचे ठिकाण व तारीख बदलणार नाही. गेले एक महिना देशातील माध्यमे केवळ राज ठाकरे यांच्या भोवतीच फिरत आहे. त्याचे कारण केवळ त्यांनी घेतलेली भूमिका आहे. कारण इतरांनी मुख्यमंत्री पदासाठी गळ्यात हिरवा साप बांधून घेतला आहे.

ते पुढे म्हणाले, ठाकरे नावात काय जादू असते ते मला कळले आहे. त्यामुळे मी अमित ठाकरे यांच्या मुलांच्या हाताखाली देखील काम करण्यास तयार आहे. रेडा वेद म्हणू शकतो तसे राज ठाकरे यांनी घोषणा करता देशातील सगळे नेते हनुमान चालीसा म्हणू लागले आहेत. काहींनी हनुमान चालीसा म्हणन्यासाठी लोक ठेवले आहेत. काहींनी तर मुल्ला ठेवले आहेत. शरद पवार यांनी तो पाणचट अमोल मिटकरी हनुमान चालीसा म्हणायला ठेवला आहे.

ते म्हणाले, मला एकच सांगायचे आहे की, ज्याचे गावाशी जमते पण भावाशी जमत नाही त्याला हनुमान चालीसा म्हणायला लोक आले तर घर सोडू पळून जावे लागते. एक म्हातारी त्यांचे घर सांभाळायला आली. मात्र याद राखा तुमच्या नेत्याला खुश करायला माझ्या नेत्यावर टिका कराल तर मी तुम्हाला सोडणार नाही.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com