Eknath Shinde: आनंद दिघेंसोबत काय झाले, ते वेळ आली की सांगेल!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत काय काय झाले, याचे आम्ही साक्षीदार आहोत.
Chief Minister Eknath Shinde
Chief Minister Eknath ShindeSarkarnama

नाशिक : मालेगाव (Malegaon) येथे झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक मोठे विधान केले. ते म्हणाले, आम्ही धर्मवीर (Dharmveer) सिनेमा करून काय काय काम केले ते मांडले. मात्र त्यांच्यासोबत काय काय झाले याचे आम्ही साक्षीदार आहोत. वेळ आली की मी सगळं सांगेन. (Dharmveer movie create for what we have done)

Chief Minister Eknath Shinde
Eknath Shinde: मालेगाव जिल्हानिर्मितीवरून शिंदे गटात मतभेद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मालेगाव येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री दादा भुसे, आमदार सर्वश्री सुहास कांदे, खासदार हेमंत गोडसे, गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, बबनराव पाचपुते, श्रीमती मंजुळाताई गावित, लताताई सोनवणे आदी उपस्थित होते.

Chief Minister Eknath Shinde
Sharad Pawar: गैरसमज दूर करत सर्वांना सोबत घेऊन चालावे

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यात गेल्या काही दिवसांत ज्या राजकीय घडामोडी घडल्या, त्याबाबत खुप खळबळ उडाली.मात्र आम्ही सर्व हिंदुत्वाची भूमिका घेऊन भाजप सोबत गेलो. गेली अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यात शविसेना हा महत्त्वाचा घटक पक्ष होता. मात्र त्या अडीच वर्षात हजारो लोकांवर गुन्हे दाखल झाले. शिवसेनेच्या सरकारमध्ये शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले हे तुम्हाला मान्य आहे त का?.

ते पुढे म्हणाले, तुम्ही सर्व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे शिवसैनिक आहात. त्यामुळे शिवसेना ही खंबीरपणे लढणारी संघटना आहे. मात्र राज्यात पक्षाचा मुख्यमंत्री असूनही शिवसेनेच्या आमदारांचे अस्तित्व धोक्यात आले होते. आम्ही अनेक वेळा ते मांडण्याचा प्रयत्न केला.मात्र दुर्दैवाने आम्हाला यश आले नाही.

आम्ही जीवाची बाजी लावून शिवसेना मोठी केली, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही कधी वर्षातून दोन- दोन वेळा परदेशात गेलो नाही. मात्र सध्याच्या पक्ष नेतृत्वाने स्वतः मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीला जवळ केले. तेव्हा विश्वासघात कोणी केला हे स्पष्ट आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टिका केली. यावेळी त्यांनी एक मोठे विधान केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे आणि माझ्यात काही गोष्टी आहेत. त्या मी ते बोलतील तसं तसं समोर आणेल. त्यातील अनेक मुद्दे उघड करीन. धर्मवीर आनंद दिघे यांचा आम्ही केवळ चित्रपट काढत काय काय काम केले हे दाखवले आहेत. पण त्यांच्या सोबत काय काय झाले हे आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. वेळ आली की ते सगळं मी सांगेल.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in