मी चार दिवसांनी पुन्हा येईन, तोपर्यंत सर्व कामे झाली पाहिजे!

येवल्यात रात्री उशिरापर्यंत पूरग्रस्त भागात पाहणी व आढावा घेण्यात आला.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

येवला : अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) बंधारे फुटले आहे त्यांचेही तातडीने (Send Urgent praposals) प्रस्ताव सादर करून दुरुस्ती करण्यात यावी. चार ते पाच दिवसात पुन्हा पाहणी दौरा करण्यात येईल तोपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत, असेही मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले.

Godawari Rever
Godawari ReverSarkarnama

कुठल्याही परिस्थितीत दोन दिवसात पूरग्रस्त भागाचे जनजीवन पूर्वपदावर आणावे. एकही आपत्तीग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये, पूरग्रस्तांना मदत करताना शासन कुठलाही भेद न करता शेतकरी, व्यापारी अन् घरकुलापासून वंचित झालेल्या आपत्तीग्रस्तांचे अहवाल २४ तासात करून त्यांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे सांगितले.

Chhagan Bhujbal
गिरणा, जायकवाडी भरले; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राची चिंता दूर!

श्री. भुजबळ यांनी आज येवला व निफाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पूरग्रस्त भागाची पाहणी त्यांनी केली. श्री. भुजबळ यांनी येवला व निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. निफाड तालुक्यातील लासलगाव परिसरात व येवला शहर व परिसरात पाहणी करून झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक घेतली. जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, महेंद्र काले, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, राधाकिसन सोनवणे, बाजार समितीचे प्रशासक सभापती वंसत पवार, साहेबराव मढवई, नगरसेवक प्रवीण बनकर, शहराध्यक्ष दीपक लोणारी, सुनील पैठणकर, विनोद पाटील, भाऊसाहेब धनवटे, अविनाश कुक्कर आदींसह अधिकारी उपस्थित होते.

Chhagan Bhujbal
अहो सीमाताई चित्रा वाघ होण्याची घाई करू नका!

श्री. भुजबळ म्हणाले,‘ नुकसानग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. शेतीचे पंचनामे तातडीने करून सोबत व्यावसायिकांच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल देखील तात्काळ शासनास पाठवावा. ज्याठिकाणी घरांची पडझड त्या ठिकाणी पंचनामे करून घरकुलांचे नुकसान झालेले असेल त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे. स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात. या भागात आरोग्य विभागाने स्वच्छता व औषध फवारणी करावी. जेथे अजून पाणी आहे त्याठिकाचे पाणी पंपाद्वारे काढण्यात यावे. उद्या संध्याकाळपर्यंत पूरग्रस्त भागाची साफसफाई करण्यात यावी, असेही श्री.भुजबळ यांनी सांगितले.

रस्त्यावर पडलेले खड्डे लवकर बुजविण्यात यावेत. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा करून तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना देताना निधीची कमतरता असल्यास त्याबाबत तातडीने प्रस्ताव पाठविण्यात यावेत. कोपरगाव मनमाड टोल रस्त्यावरील ड्रेनेज आणि रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी.

कोरोनाचा घेतला आढावा

रुग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. धार्मिक व इतर सोहळ्यातून रुग्ण संख्या वाढत आहे ही चिंतेची बाब असून नागरिकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. परवानगी न घेता कार्यक्रम घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,असे निर्देश दिले.

पूरग्रस्त भागाची पाहणी

रात्री उशिरा शहरातील विंचूर चौफुली परिसरातील लक्कडकोट वस्ती, शॉपिंग सेंटर, बाजारपेठेची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेत झालेल्या नुकसानीबाबत मदत देण्याचे आश्वासन भुजबळ यांनी दिले. आमदार निधीतून नगरसूल ग्रामीण रुग्णालयास रुग्णवाहिका देण्यात आली, या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आज करण्यात आले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com