४० वर्षे राबूनही मला झाला नाही, तो भाजप कार्यकर्त्यांना कसा होईल?

चोपडा येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भादले बंधूंनी केला पक्षप्रवेश
Eknath Khadse

Eknath Khadse

Sarkarnama

चोपडा : नाथाभाऊ कोणत्याही पक्षासाठी नवीन असला तरी कार्यकर्त्यांसाठी जुनाच आहे. ४० वर्षे भाजपमध्ये (BJP) राहून जो पक्ष मला झाला नाही, तो पक्ष कार्यकर्त्यांना कसा होईल, असा घणाघात माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला.

<div class="paragraphs"><p>Eknath Khadse</p></div>
अहो तुम्ही टपरीवर फिरत होता, मी तुम्हाला मंत्री केले!

ते म्हणाले, पक्ष विस्तार करायचा असेल तर गावपातळीवर जावे लागेल. संघटना वाढवावी लागेल. सरकारने घेतलेले निर्णय कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहचवले पाहिजे. आरोप करण्यापेक्षा आरोपाला सामोरे जावे. अटलजींनी १३ पक्षांचे सरकार चालविले तर आम्ही तीन पक्षांचे सरकार का चालविणार नाही? असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.

<div class="paragraphs"><p>Eknath Khadse</p></div>
देवीदास पिंगळेंनी भाजपच्या दिनकर पाटील पॅनेलचा उडवला धुव्वा!

चोपडा येथे पदम मोहन मंगल कार्यालयात राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील उपस्थित होते.

खडसे पुढे म्हणाले, की एका रात्री माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी चमत्कार केला आणि महाविकास आघाडीचे सरकार आणले. सरकार पडणार म्हणून सांगणारे पळायला, वाकायला लागले आहेत. खालचा कार्यकर्ता सक्रिय झाला पाहिजे. तेव्हा पक्षाचा विस्तार होईल. राज्याचे नेते आपल्याकडे आलेत आणि कार्यकर्ते जेवायला गेलेत, हे चुकीचे असल्याचे खडेबोल खडसेंनी सुनावले. मी शून्यातून भाजप उभा केले आहे. मला जिल्ह्याच्या नाड्या माहीत आहेत. आतापर्यंत मी अपयश घेतले नाही. यशाचा धनी झालो आहे. सर्व जिल्हा राष्ट्रवादीमय करता येईल.

यावेळी माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे, मनीष जैन, राजीव देशमुख, माजी खासदार वसंतराव मोरे, जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, चोसाकाचे माजी चेअरमन ॲड. घनश्याम पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, चोसाका चेअरमन अतुल ठाकरे, बाजार समितीचे संचालक सुनील जैन, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष विजया पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य इंदिराताई पाटील, माजी उपनगराध्यक्ष असगरअली सय्यद, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, उपनगराध्यक्ष भूपेंद्र गुजराथी, गटनेते जीवन चौधरी, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष श्याम परदेशी यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com