Eknath Shinde: एकनाथ शिंदे गटाचे आमदार चार दिवसातच गटबाजीने अस्वस्थ?

बंडखोरच म्हणतात, `गुलाबरावांचे दहा जन्म गेले तरी ठाकरेंचे उपकार फिटणार नाही`
Chimanrao Patil News,  Gulabrao Patil News, Eknath Shinde News, Shivsena News,
Chimanrao Patil News, Gulabrao Patil News, Eknath Shinde News, Shivsena News, Sarkarnama

जळगाव : आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आपल्याला शिवसेनेत (Shivsena) त्रास दिला. परंतु आता तेच शिंदे गटात आल्याने आपल्या पदरात पुन्हा तेच आलंय.. अशी खंत शिवसेना बंडखोर व शिंदे गटाचे (Eknath Shinde) पारोळा तालुक्यातील आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांनी व्यक्त केली आहे. (Chimanrao Patil leave Shivsena dut Gulabrao Patil but he also join Shinde group)

Chimanrao Patil News,  Gulabrao Patil News, Eknath Shinde News, Shivsena News,
जितेंद्र नवलानीला शिंदे सरकारकडून क्लिन चिट; खंडणी प्रकरणाची चौकशी पोलिसांनी गुंडाळली

याबाबत जामनेर येथे एका कार्यकर्त्यांशी बोलतानाची त्यांची क्लीप काल सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. चिमणराव पाटील यांनी आपण गुलाबराव पाटील यांना कंटाळून शिवसेना सोडली, असा दावा केला. ते खरे असेल तर पुन्हागुलाबराव पाटील हेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मंत्रीपदाची चॅाईस असू शकतात. अशा स्थितीत चिमणराव पाटील काय करणार?. एका म्यान आणि दोन तलवारी अशी जळगावच्या राजकारणाची स्थिती होऊ शकते. यावर बंडखोर शिवसेना गटाला तोडगा शोधावा लागणार आहे.(Eknath Shinde Latest Marathi News)

Chimanrao Patil News,  Gulabrao Patil News, Eknath Shinde News, Shivsena News,
छगन भुजबळ म्हणाले, शरद पवार यांना असे प्रसंग नवीन नाहीत

आमदार चिमणराव पाटील यात आपल्यावर शिवसेनेत अन्याय झाल्याची खंत व्यक्त करीत आहेत. ते म्हणतात, शिवसेनेत आपल्याला मोठ्या प्रमाणात त्रास झाला.जामनेरलाही तोच त्रास दिला आहे. आमदार गुलाबराव पाटील यांच्यापासूनच त्रास आहे. आपण वरिष्ठ नेत्यांना त्याबाबत सांगून सांगून कंटाळलो, परंतु एकानेही आपल्याकडे लक्ष दिले नाही.

ना निधी.. ना दखल

मला मतदार संघात निधी दिला नाही, इतका त्रास दिला कि मी शिवसेनेत राहू नये. उद्धव साहेबांनाही सांगितले, साहेब मी गेली २९ वर्षे शिवसेनेत आहे, माझी एक तरी चुक दाखवा, परंतु त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांच्या त्रासामुळे मी काय करणार? आमचे कार्यकर्ते मरायला लागले होते. त्यांनी आपल्याला पाडले हो २०१३ मध्ये तरी गुलाबराव पाटील यांना मंत्री केले. मग किती दिवस सहन करायचे मग मरायचे काय? आता जे होईल ते पाहू, मला शिवसेनेत न्यायच मिळत नव्हता, डायरेक्ट उदघाटनाला यायचे ना ते मला विचारतही नव्हते. मी खानदानी माणूस म्हणून हे सर्व सहन केले. असे सांगितले. मात्र, त्यांनी त्याची कुठलीही दखल घेतली नाही.

माझ्याविरोधात काम

पोलिसातही आमच्या विरोधात गुलाबराव पाटील फोन करीत होते. अधिकाऱ्यांना तसेच सहकार विभागातील अधिकाऱ्यांना फोन करून माझ्या विरोधात निकाल दे असे सांगायचे. आता तेच गुलाबराव पाटीलही तिथे आले असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले., त्यावेळी आमदार पाटील म्हणाले, ते आपल्यानंतर आले आहेत. या माणसाला मंत्री केले ते तिकडून फुटन येतील, असे वाटत नव्हते. यांचे दहा जन्मही उद्धव साहेब यांचे उपकार फिटले नसते. मी उद्धव साहेबांना हे सुद्धा सांगितले की, साहेब मी शिवसेनेत राहू नये म्हणून हे असे करीत आहेत.

कार्यकर्ता संवादात म्हणतो, आबा तुम्हाला सांगतो हे अन्यायबाज लोकच आता शिंदे गटातही आहे, मग तुमच्यावर तिथेही अन्याय होणार आहे, आता काय करणार? त्यावर आमदार चिमणराव पाटील म्हणतात, जे होईल ते होईल आता काय करायचे शिवसेनेत वरिष्ठ नेते माझ्याशी कोणी बोलतही नव्हते ना हो, जिल्हा बँकेचा व्हाइस चेअरमनपदी अमोल याला करावे अशी जिल्ह्याची इच्छा होती, यांनी मात्र चंदूअण्णांच्या भावाला केले. किती दिवस लढणार यांच्याशी? मी शिंदे साहेबांना आपल्याला होणाऱ्या त्रासाबाबत सांगितले आहे. ते पाहतील आता जे होईल ते बघू, आपल्याला मंत्रिपदाचे काही नाही, मात्र केवळ सन्मान हवा होता. यावर कार्यकर्ता म्हणतो, आबा गुलाबरावांनी जिल्ह्यात शिवसेना संपविली त्यावर चिमणराव पाटील म्हणतात, त्यांनी जामनेरात, चाळीसगावात शिवसेना वाढू दिली नाही. हे मला माहिती आहे. शिवसेना संपायला ते कारणीभूत आहेत. त्यावर कार्यकर्ता म्हणतो, आबा तुम्ही यांची साथ सोडा पुन्हा उद्धव साहेबाकडे जा.. त्यासाठी मी देवाला साकडे घालतो.. त्यावर चिमणराव पाटील म्हणतात, बघू, बघू!

------------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com