धनंजय मुंडे म्हणाले, मी संघर्षातून खलनायकाचा नायक झालो!

(कै) गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न जबाबदारीने पूर्ण करणार असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला.
NCP Leader Dhananjay Munde
NCP Leader Dhananjay MundeSarkarnama

जळगाव : आज मी नायक (Leader) असलो तरी आपल्याला मोठा राजकीय संघर्ष करावा लागला आहे. अगदी आपल्याला दगडही झेलावे लागले आहेत. परंतु नियतीने आज त्याच संघर्षातून (Political struggle) आपल्याला नायक बनविले आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक व न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी केले.

NCP Leader Dhananjay Munde
इंधन दरवाढीवर आंदोलन करणारे भाजपचे नेते, कार्यकर्ते लपून बसले

श्री. मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी सर्वसामान्य जनतेसाठी कार्य केले. त्यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी नियतीने आपल्या खांद्यावर टाकली आहे. ती आपण पूर्ण करणार आहोत, असा विश्‍वास व्यक्त केला.

NCP Leader Dhananjay Munde
हिंदुहृदयसम्राट, धर्मवीर हे जनता ठरवत असते; ते मागून मिळत नाही : उद्धव ठाकरे

जळगाव शहरातील मेहरूण परिसरात लोकनेते (स्व.) गोपीनाथराव मुंडे प्रवेशद्वाराचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी मंत्री एकनाथ खडसे, राष्ट्रवादी कॉंग्रसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, महापौर जयश्री महाजन आदी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत अशोक लाडवंजारी, प्रशांत नाईक आदींनी केले.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, की भाजप राज्यात सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्या काळी गोपीनाथ मुंडे व एकनाथ खडसे यांनी केले. महाराष्ट्राचे दोनच नाथ ‘एकनाथ-गोपीनाथ’ अशा घोषणा आम्ही त्या वेळी देत होतो. (स्व.) गोपीनाथ मुंडेंच्या सहवासात आपण राजकीय कारकीर्द घडविली. त्यांचे कार्य आपण अत्यंत जवळून पाहिले आहे.

ते म्हणाले, ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्याची त्यांची इच्छा होती, ती आपण मंत्री म्हणून पूर्ण करू शकलो, आपल्या कार्यकाळात आपण हे महामंडळ स्थापन केले. सर्व समाजाला सोबत घेऊन त्यांचा विकास करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, ती आपण पूर्ण करणार, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com