Pankja Munde: पंकजाताई म्हणतात, मला तो `सुखद` अनुभव आलेला नाही!

एका वाहिनीच्या मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी मी देखील इतर पक्षातील आमदार फोडलेत असे सांगितले.
Pankja Munde
Pankja MundeSarkarnama

मुंबई : महाविद्यालयात शिकत असताना, गृहमंत्र्यांची (Home Minister) मुलगी म्हणून सोबत सुरक्षा रक्षक असायचे. त्यामुळे कोणी जवळच येत नव्हतं. महाविद्यालयीन (Collage life) आयुष्यात कोणी प्रपोज करणं किंवा इतर काही झालचं नाही. मला तो सुखद अनुभव आलेला नाही. मात्र एकदा दोस्ती झाली की झाली, असे भाजप (BJP) नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankja Munde) यांनी एका वाहिनीवरील गप्पांच्या कार्यक्रमात सांगितले. (Pankja Munde share various personal experiences of Collage life)

Pankja Munde
Nana Patole: नाना पटोले देतील का नाशिक काँग्रेसला अध्यक्ष!

पंकजा मुंडे यांची एका वाहिनीत वेगळ्या धाटनीची मुलाखत सुबोध भावे यांनी घेतली. यावेळी त्या बोलत होते. त्या म्हणाले, आता कधी, कोणत्या पक्षाचे आमदार फोडले, हे सांगत बसलो तर त्यासाठी एक तास देखील पुरायचा नाही. अनेक आमदारांनी आमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे. माझ्या बीड जिल्ह्यात अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

Pankja Munde
NCP News: राष्ट्रवादी म्हणते, रस्तेच खराब; मगटोल का द्यावा?

त्या म्हणाल्या आज मी ज्या स्तरावरराजकारण करते आहे, त्यात मला बाबांनी (गोपीनाथ मुंडे) नेहमी एक वाक्य सांगितले आहे. बेरजेचे राजकारण करायचे, वजाबाकीचे राजकारण करायचे नाही. आपल्याकडे बेरीज होत असते. राजकारणात आणि युद्धात जिंकणे महत्त्वाचे असते. त्यासाठी किमान आपल्याला शोभतील अेस लोक बरोबर घेण्याचा मी तरी प्रयत्न करीत असते. बीड जिल्ह्यात मी आत्ता राष्ट्रवादीच्या नमीता मुंदडा यांना आमदार केले आहे. सुरेश धस राष्ट्रवादीमध्ये होते, त्यांना पक्षात घेतले.

यावेळी विविध महिलांनी देखील त्यांना प्रश्न विचारले. तुमच्यात एक चांगली अभिनेत्री दडलेली आहे. एक प्रसिद्ध संवाद आहे, `एक चुटीक सिंदूर की किमत तुम क्या जानो रमेशबाबू` हा संवाद तुमच्यासाठी `एक एक आमदारकी किमत तुम क्या जानो सुबोधबाबू` यावर त्यांनी हा संवाद देखील म्हटला. त्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.

कॅालेज लाईफ फनी नव्हतं

पंकजाताई जयहींद कॅालेजच्या विद्यार्थीनी होत्या. त्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असल्याने त्यांना सुरक्षा होती का? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, अर्थातच मी शिकत होते, तेव्हा मुंडे साहेब राज्याचे गृहमंत्री होते. त्यांना अंडरवर्ल्डच्या धमक्या येत असायच्या. त्यामुळे त्यांना खुप सुरक्षा होती. तशी मलाही होती. बॅाडीगार्ड होता. त्यामुळे माझं कॅालेज लाईफ काही फारसं फनी नव्हतं.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com